एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

ठाणे : नव्वदच्या दशकामध्ये मराठीमध्ये अनेक ग्लॅमरस कलाकार होते. हिंदी इंडस्ट्रीत असतं तसं चमचमतं ग्लॅमर त्यांना नसलं तरी तो कलाकार शहरात आला की त्याला बघायला गर्दी होत असे. अशा कलाकारांत आवर्जून गणती होणारे अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते 68 वर्षांचे होते.

एक चार्मिंग अभिनेता अशी त्यांची इमेज होती. 1978 मध्ये त्यांनी चित्रपसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यापूर्वी ते नाटकांतून काम करत होतेच. त्यांनी केलेले अनेक सिनेमे गाजले. यात जशास तसे, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार आदी अनेक चित्रपटांत काम केलं. शिवाय रंगभूमीशीही त्यांनी आपली नाळ जोडलेलीच ठेवली. यात सौजन्याची एैशीतैशी, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुज आहे तुजपाशी या नाटकांचा त्यात समावेश होतो. तुज आहे तुजपाशी हे नाटक तर विक्रमी म्हणायला हवं.

तुज आहे तुजपाशी या नाटकात अविनाश खर्शीकर श्यामची भूमिका रंगवत होते. या नाटकात श्याम विशीतला होता. ह नाटक सुरु झालं तेव्हा अविनाश दिसायला देखणे आणि श्यामच्या भूमिकेला चपखल बसणारे होते. त्यांच्या भूमिकेवर रसिकांनी उदंड प्रेम केलं. या नाटकाचे विक्रमी प्रयोग झाले. जवळपास ३० वर्षं या नाटकाचे प्रयोग चालू होते. हे सर्व प्रयोग श्याम वठवला तो अविनाश खर्शीकर यांनीच.

त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर सुकन्या मोने, विजू माने, रेणुका शहाणे, अमोल कोल्हे आदी अनेकांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी काही मालिकांमध्येही काम केलं. यात उल्लेख करायला हवा तो दामिनी या मालिकेचा. नव्वदच्या दशकात अत्यंत चार्मिंग दिसणारा अभिनेता म्हणून त्यांची गणना केली जायची. अलिकडच्या काळात शेमारु या कंपनीसाठी ते कार्यरत होते. अगदी दोन दिवसांपूर्वी पर्यंत ते नव्या नियोजनात व्यग्र होते. पण आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Avinash Kharshikar | 'तुज आहे तुजपाशी' फेम अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Pakistan War : युद्धात फक्त पाकिस्तानचाच होईल विनाश, भारत सर्वार्थानं मजबूत; अमेरिकन एजन्सीचा दावा, अहवालात नेमकं काय?
युद्धात फक्त पाकिस्तानचाच होईल विनाश, भारत सर्वार्थानं मजबूत; अमेरिकन एजन्सीचा दावा, अहवालात नेमकं काय?
India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार
भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार
Maharashtra Weather Update: बीड, हिगोंलीमध्ये मुसळधार पाऊस; 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, 'वाचा हवामान विभागाचा अंदाज
बीड, हिगोंलीमध्ये मुसळधार पाऊस; 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, 'वाचा हवामान विभागाचा अंदाज
शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे
शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 7 AM Top Headlines 6 May 2025 एबीपी माझा सकाळी 7 च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha | 6:30 AM | माझं गाव माझा जिल्हा | 6 May 2025 | ABP MajhaABP Majha Headlines 6.30 AM Top Headlines 6 May 2025 सकाळी 6.30 च्या हेडलाईन्सIndia Vs Pak War : पहलगाम हल्ल्यानंतर येत्या काही दिवसांत काही तरी मोठं घडणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan War : युद्धात फक्त पाकिस्तानचाच होईल विनाश, भारत सर्वार्थानं मजबूत; अमेरिकन एजन्सीचा दावा, अहवालात नेमकं काय?
युद्धात फक्त पाकिस्तानचाच होईल विनाश, भारत सर्वार्थानं मजबूत; अमेरिकन एजन्सीचा दावा, अहवालात नेमकं काय?
India Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार
भारत-पाकिस्तान युद्धाच्या एक पाऊल आणखी जवळ, इकडे मॉकड्रील तिकडे बॉर्डरवर पाकिस्तानचा अंदाधुंद गोळीबार
Maharashtra Weather Update: बीड, हिगोंलीमध्ये मुसळधार पाऊस; 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, 'वाचा हवामान विभागाचा अंदाज
बीड, हिगोंलीमध्ये मुसळधार पाऊस; 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, 'वाचा हवामान विभागाचा अंदाज
शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे
शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे
कल्याणमध्ये 1 हजार रुपयांसाठी रुग्णावाहिका नाकारली, महिला दगावली; 2 लेकर अनाथ
कल्याणमध्ये 1 हजार रुपयांसाठी रुग्णावाहिका नाकारली, महिला दगावली; 2 लेकर अनाथ
China : जग भारतासोबत, मात्र चीनची उलटी चाल... दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा जाहीर, चीनी राजदूतांच्या भेटीनंतर पाकच्या माध्यमांचा दावा
जग भारतासोबत, मात्र चीनची उलटी चाल... दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा जाहीर, चीनी राजदूतांच्या भेटीनंतर पाकच्या माध्यमांचा दावा
HSC results 2025 विदर्भकन्या राज्यात पहिली; 12 वी बोर्ड परीक्षेत मितालीला 99 टक्के गुण, 3 विषयांत 100%
विदर्भकन्या राज्यात पहिली; 12 वी बोर्ड परीक्षेत मितालीला 99 टक्के गुण, 3 विषयांत 100%
धक्कादायक! 12 वीला कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन; नीटचा पेपर अवघड गेल्यानेही टोकाचं पाऊल
धक्कादायक! 12 वीला कमी गुण, विद्यार्थ्याने संपवले जीवन; नीटचा पेपर अवघड गेल्यानेही टोकाचं पाऊल
Embed widget