(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ved : बॉक्स ऑफिसवर आपल्या भावाची हवा; रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ने मोडला नागराज मंजुळेंच्या 'सैराट'चा रेकॉर्ड; जाणून घ्या दहा दिवसांची कमाई...
Ved : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने 'सैराट' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड सुरू आहे. या सिनेमाने आता नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित 'सैराट' (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा 'सैराट' हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने 12.10 कोटींची कमाई केली होती. आता 'वेड' या सिनेमाने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 33.42 कोटींची कमाई केली आहे.
'वेड'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection)
पहिला दिवस - 2.25 कोटी
दुसरा दिवस - 3.25 कोटी
तिसरा दिवस - 4.50 कोटी
चौथा दिवस - 3.02 कोटी
पाचवा दिवस - 2.65 कोटी
सहावा दिवस - 2.55 कोटी
सातवा दिवस - 2.45 कोटी
आठवा दिवस - 2.52 कोटी
नऊवा दिवस - 4.53 कोटी
दहावा दिवस - 5.70 कोटी
एकूण कमाई - 33.42 कोटी
View this post on Instagram
रिलीजच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 'वेड' (Ved) या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी या सिनेमाने 5.70 कोटींचा गल्ला जमवला आहे. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईचा आलेख वाढत चालला आहे. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
रितेश आणि जिनिलियाचा (Genelia DSouza) 'वेड' (Ved Movie) हा सिनेमा चाहते पुन्हा पुन्हा आवडीने पाहत आहेत. या सिनेमाचे चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा किती कमाई करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
संबंधित बातम्या