Varun Dhawan: वरुण धवन करतोय 'या' आजाराचा सामना; जाणून घ्या लक्षणं
वरुणनं (Varun Dhawan) एका मुलाखतीमध्ये सांगितलं, तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराचा सामना करत आहे.
Varun Dhawan: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूनं तिच्या आरोग्याबाबात माहिती दिली होती. समंथा मायोसायटिस (Myositis) या दुर्मिळ आणि गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं (Varun Dhawan) देखील त्याच्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे. वरुणनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, तो वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजाराचा सामना करत आहे. 'मी स्वत:वर खूप कामाचा दबाव निर्माण केला होता, ज्याचा मला त्रास होत आहे. यामुळेच मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास होत आहे.' असं त्यानं मुलाखतीमध्ये सांगितलं.
काय आहे वेस्टिब्युलर हायपोफंक्शन?
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूला संदेश पाठववणारा कानाचा भाग व्यवस्थित काम करत नाही. हा आजार कानाच्या आत एका भागात होतो, ज्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे शरीराचे संतुलन बिघडते.
लक्षण
खराब रक्ताभिसरण, संसर्ग, कानात कॅल्शियमचा अपव्यय यांमुळे वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा आजार होऊ शकतो. चक्कर येणे, कशावरही लक्ष न लागणे अशा प्रकारची अनेक प्रकारची लक्षणे या आजाराची असू शकतात. गाडी चालवतानाही दिसण्यात आणि चालवण्यात अडथळा येतो. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांना मळमळ, चिंता, उलट्या देखील जाणवू शकतात. यासोबतच हळूहळू श्रवणशक्तीही संपुष्टात येऊ लागते.
उपचार
व्हिएच म्हणजेच वेस्टिब्युलर हायपोफंक्शन या आजारावर अनेक प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात. अँटिबायोटिक्स किंवा अँटीफंगल उपचार किंवा अगदी शस्त्रक्रियेद्वारे देखील यावर उपचार केले जाऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ला न घेता कोणत्याही आजारावर उपचार घेऊ नये.
काही दिवसांपूर्वी वरुणचा जुग जुग जियो हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता त्याचा भेडीया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी जॉनरवर आधारित आहे. या चित्रपटात वरुणसोबत अभिनेत्री क्रिती सेनन प्रमुख भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bhediya-Junoon: वरुण धवनच्या 'भेडीया' ला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, '30 वर्षांपूर्वीचं....'