Vaishali Thakkar : लग्नाआधीच वैशाली ठक्करने संपवलं जीवन; डिसेंबरमध्ये करणार होती लग्न
Vaishali Thakkar : वैशाली ठक्कर डिसेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार होती.

Vaishali Thakkar Suicide : मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Thakkar) आत्महत्या केल्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. तपासादरम्यान पोलिसांना वैशालीच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. आधीच्या बॉयफ्रेडकडून छळ होत असल्याने तिने सुसाईड केल्याचं समोर आलं आहे.
वैशालीची जवळची मैत्रीण जान्हवीने मीडियाला माहिती देत म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी माझं आणि वैशालीचं फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी दिवाळीनंतर लग्नाची खरेदी करण्यासाठी मी मुंबईत येईल असं वैशाली मला म्हणाली होती. तसेच ती माझ्या घरी काही दिवस राहायला येणार असल्याचंदेखील म्हणाली होती. तिने मला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल म्हणजेच मितेशबद्दलदेखील सांगितलं होतं. वैशालीने माझं आणि त्याचं व्हिडीओ कॉलद्वारे बोलणं करून दिलेलं. मितेश एक चांगला मुलगा आहे".
वैशालीने जान्हवीला तिच्या आयुष्यात सर्व चांगलं घडत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच वैशालीच्या निधनाने जान्हवीला मोठा धक्का बसला आहे. वैशाली सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
View this post on Instagram
वैशालीला वाचनाचादेखील छंद होता. चांगलं पुस्तक आणि खाणं असेल तर प्रवास सुखकर होतो अशा आशयासंदर्भात भाष्य करणारी एक पोस्ट वैशालीने सोशल मीडियावर शेअर केली होती. वैशाली येत्या डिसेंबरमध्ये मितेशसोबत लग्नबंधनात अडकणार होती. दोघेंच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
वैशालीचा जवळच्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला होता. कोरोनामुळे वैशालीचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. त्यावेळी एका मुलाखतीत वैशाली म्हणाली होती,"कोरोनामुळे अनेक लोक आपला जीव गमवत असताना अशा परिस्थितीत मी लग्न करू शकत नाही. पुढच्या वर्षी जर परिस्थिती चांगली झाली तर आम्ही लग्न करू".
संबंधित बातम्या
Vaishali Thakkar Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करच्या मृत्यूनंतर तिची इंस्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल; पोलिस म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
