एक्स्प्लोर
दीर्घ आजाराने उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं पुण्यात निधन
जयपूर येथील बहराम खाँ डागर या निवासस्थानजवळील दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. धृपद गायकीच्या क्षेत्रातील तारा म्हणून ते ओळखले जात होते.
पुणे : ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.
जयपूर येथील बहराम खाँ डागर या निवासस्थानजवळील दर्गा परिसरात त्यांचा दफनविधी होणार आहे. धृपद गायकीच्या क्षेत्रातील तारा म्हणून ते ओळखले जात होते.
शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गायनाची साधना सुरू ठेवली. डागर घरण्यातल्या 19 व्या पिढीतील ते गायक होते. डागर घराण्याची परंपरा थेट स्वामी हरिदासांपर्यंत पोहोचते.
उस्ताद सईदुद्दीन यांचा अल्पपरिचय
- उस्ताद सईदुद्दीन डागर मूळचे राजस्थानातील आहेत
- जन्म 20 एप्रिल 1939 रोजी जयपूरमध्ये झाला
- 1984 सालापासून ते पुण्यात स्थायिक झाले
- डागर घराण्यातील 19 व्या पिढीतील ते गायक होते
- त्यांची दोन्ही मुले नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन यांनी त्यांची धृपद गायकीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
- परदेशातही त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement