Urfi Javed : उर्फी जावेदचा पुन्हा अतरंगी लूक; एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "या कपड्यांमध्ये ती प्रवास कसा करेल?"
Urfi Javed : नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील उर्फीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Urfi Javed : उर्फी जावेदचा पुन्हा अतरंगी लूक; एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, urfi javed outfit airport look gets netizens trolled actress video viral on social media Urfi Javed : उर्फी जावेदचा पुन्हा अतरंगी लूक; एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/11/1a414e0ad6ef81f8543b33bd4a425ec91699706306026259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urfi Javed : उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फी ही अनेक वेळा हटके लूकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट होते. नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील उर्फीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
उर्फीचा व्हिडीओ व्हायरल
व्हाईट कलरचा आऊटफिट आणि डोक्यावर व्हाईट टोपी अशा लूकमध्ये उर्फी एअरपोर्टवर स्पॉट झाली. उर्फीनं तिचा या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला लेके प्रभू का नाम हे सलमान खानच्या टायगर-3 या चित्रपटामधील गाणं ऐकू येत आहे. उर्फीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी उर्फीला तिच्या आऊटफिटमुळे ट्रोल केलं.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "या कपड्यांमध्ये ती प्रवास कसा करेल?". तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सारखं विमानतळावर कशाला जाता मॅडम? तेही अशा कपड्यात."
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी उर्फीचा आणखी एक एअरपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवर एका व्यक्तीसोबत वाद घालताना दिसली. एअरपोर्टवरील व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उर्फीला म्हणतो, 'देशाचं नाव खराब करत आहेस' त्यानंतर उर्फी त्या व्यक्तीला म्हणते, 'आपके बाप का कुछ जा रहा है? नहीं जा रहा ना तो जाओ अपना काम करो.'
उर्फीनं ही कधी प्लास्टिक, कधी वायर तर कधी काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करते. तिच्या या लूकची चर्चा सोशल मीडियावर होते. उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करत असते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)