Urfi Javed: उर्फी जावेदचा अतरंगी लूक; अभिनेत्रीला पाहताच रडायला लागला लहान मुलगा, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
Uorfi Javed: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उर्फी ही एअरपोर्टवर एका लहान मुलासमोर उभी राहिलेली दिसत आहे. हा लहान मुलगा उर्फीला पाहिल्यानंतर रडायला सुरुवात करतो.
![Urfi Javed: उर्फी जावेदचा अतरंगी लूक; अभिनेत्रीला पाहताच रडायला लागला लहान मुलगा, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ uorfi javed new look child crying Urfi Javed turned around and apologized video viral Urfi Javed: उर्फी जावेदचा अतरंगी लूक; अभिनेत्रीला पाहताच रडायला लागला लहान मुलगा, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/bf12f5bc237318ad7584e65ccb122dc41698148949397259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Uorfi Javed: आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदचा (Uorfi Javed) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी ही एअरपोर्टवर एका लहान मुलासमोर उभी राहिलेली दिसत आहे. हा लहान मुलगा उर्फीला पाहिल्यानंतर रडायला सुरुवात करतो. उर्फीच्या आणि या लहान मुलाच्या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये उर्फी ही व्हाईट ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. उर्फीचे हात या व्हिडीओमध्ये दिसत नाहीयेत. अशातच एक कुटुंब उर्फीसोबत फोटो काढण्यासाठी येते. या कुटुंबामधील लहान मुलगा हा उर्फीला पाहिल्यानंतर लगेच रडायला सुरुवात करतो. त्यानंतर उर्फी त्या मुलाला 'सॉरी' म्हणते, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फीने व्हाईट ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये तिने तिचे हात पूर्णपणे लपवले होते. उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर तो लहान मुलगा रडायला लागला त्यानंतर उर्फी त्या मुलाला म्हणते, 'डर क्यों रहा है? सॉरी भाई, सॉरी यार'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर फोटोमुळे उर्फी ही चर्चेत असते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.
उर्फीनं याआधी प्लास्टिक, वायर आणि काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे देखील चर्चेत असते.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)