Urfi Javed On Health : उर्फी जावेदला रुग्णालयातून डिस्चार्ज; म्हणाली, आता तब्येत...
Urfi Javed : प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्री उर्फी जावेदला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तिची प्रकृती सुधारली असून तिला डिस्चार्ज मिळाला आहे.
Urfi Javed On Hospitalised : अभिनेत्री उर्फी जावेदला (Urfi Javed) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. प्रकृती खालावल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्फीने रुग्णालयातील फोटो शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. दोन दिवसांनंतर उर्फीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उर्फीला उलट्या होत होत्या. त्यानंतर तिला ताप यायला लागला. त्यामुळे तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोकिलाबेन रुग्णालयात उर्फीवर दोन दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उर्फीने आता तब्येतीकडे लक्ष देणार असल्याचे म्हटले आहे. कितीही काम केले तरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच वेळ काढेन, असे उर्फी म्हणाली आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्यामुळे ती सोशल मीडियावर सक्रिय राहिली नाही. अलीकडेच उर्फी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. उर्फीने पिवळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
संबंधित बातम्या