Urfi Javed : उर्फीने घेतली चाहतची शाळा; म्हणाली, तू दोन व्यक्तींसोबत...
Urfi Javed : चित्रविचित्र स्टाईल्समुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत असते.
Urfi Javed On Chahatt Khanna : चित्रविचित्र स्टाईल्समुळे उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फीला नेटकरी ट्रोल करताना दिसून येतात. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत उर्फी दररोज नवीन स्टाईलमधील तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता उर्फीने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाची (Chahatt Khanna)शाळा घेतली आहे.
चाहत खन्नाने इंस्टा स्टोरीवर उर्फीसोबतचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"घराबाहेर असे कपडे परिधान करून कोण जातं? जर कोणी कपडे घालणं बंद केलं तर ती मीडियाच्या दृष्टीने सेलिब्रिटी होते का?". चाहत खन्नाची पोस्ट उर्फीच्या पसंतीस उतरलेली नाही.
उर्फीने घेतली चाहतची शाळा
आता उर्फीने चाहतच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं आहे, मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा ड्रेस परिधान केलेला नसून एका मुलाखतीसाठी घातला होता. तू माझ्यावर जळू नकोस. तू दोन व्यक्तींसोबत घटस्फोट घेतलास तेव्हा मी तुला कोणत्या गोष्टीवरून जज केलं नाही. तर तु मला का जज करतेस".
स्क्रीनशॉट शेअर केल्यानेतर उर्फीने एक बॅकलेस फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, अशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी कोणच्या परवानगीची आवश्यकता आहे? मला चाहत्यांचे प्रेम मिळत नाही. तू फक्त माझ्यावर जळत राहा. तुझ्या मुलीसाठी मात्र वाईट वाटतं".
View this post on Instagram
संबंधित बातम्या