Urfi Javed : 'मध्यमवर्गीय असल्याचं नाटक करतात, त्याचा जास्त राग येतो'; उर्फीचा आलिया आणि साराकडे रोख?
Urfi Javed : उर्फीने बॉलीवूडमधली कोणती गोष्ट खटकते यावर प्रतिक्रिया दिली असून तिने बॉलीवूडमधल्या श्रीमंत सेलिब्रेटींवर टीका केल्याचं पाहायला मिळालं.
Urfi Javed : उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते, पण तिच्या वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असते. नुकतच तिने बॉलीवूडमधल्या काही श्रीमंत कलाकारांवर वक्तव्य केलेली चर्चेत आली आहेत. तसेच तिने आलिया आणि सारा अली खान यांच्यावर ही टीका केल्याचंही म्हटलं जात आहे. अनेकदा हे बॉलीवूड सेलिब्रिटी मिडल क्लास होण्याचं नाटक करतात, असं म्हटतं उर्फीने आलियावर निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.
उर्फीने नुकतच इस्टंट बॉलीवूडसोबत संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडवर केलेल्या या वक्तव्यामुळे उर्फी चर्चेत आली आहे.
उर्फीने काय म्हटलं?
उर्फीने म्हटलं की, 'जेव्हा श्रीमंत सेलिब्रिटी असं म्हणतात की, एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो आहोत, पालनपोषण खूप वाईट झालंय. तेव्हा मला खरंच राग येतो. आम्हाला माहित आहे की तुम्ही श्रीमंत होता. आम्ही एकदम मध्यमवर्गीय होतो. तुम्ही म्हणता की आम्ही कधीही फर्स्ट क्लासमध्ये विमानातून प्रवास केला नाही, आमची परिस्थिती नव्हती. अरे आम्ही तर त्यावेळी विमानात बसलो देखील नाही, इतकी आमची परिस्थिती वाईट होती.
पुढे तिने म्हटलं की, 'श्रीमंत सेलिब्रिटी जेव्हा मध्यमवर्गीय असल्याचे भासवतात तेव्हा ते मी किती गरीब आहे हे दाखवून प्रेक्षकांशी जोडण्याचा खूप प्रयत्न करतात. आताही मध्यमवर्गीय कुटुंबाताच राहत असल्याचं म्हणत तुम्ही म्हणता की मी जास्त खर्च करत नाही. मी खूप कंजूष आहे. मग तुम्ही का कमावता? ही नाटकं मला आवडत नाहीत. तुम्ही जसे आहात तसेच राहा.'
उर्फी बिग बॉस ओटीटीमुळे चर्चेत
उर्फीने तिच्या करिअरची सुरुवात मालिकेतून केली. मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, कसौटी जिंदगी की आणि इतर अनेक मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यानंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. तिच्या पोस्टवर अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. पण याचा उर्फीवर कधीच कोणता परिणाम होत नाही आणि ती प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसते.