Upcoming Web Series-Films : येत्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार 'या' वेबसीरिज आणि सिनेमे
Upcoming Web Series-Films : यंदाचा आठवडा प्रेक्षकांसाठी खास आहे. येत्या आठवड्यात अनेक वेबसीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
Upcoming Web Series-Films : कोरोनाकाळात अनेक सिनेमे आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवल्याने आताही अनेक निर्माते ओटीटीवरच सिनेमे प्रदर्शित करत आहेत. येत्या आठवड्यात अनेक वेबसीरिज आणि सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत.
'तुलसीदास ज्युनिअर' हा सिनेमा या आठवड्यात 19 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मृदुलने केले असून आशुतोष गोवारीकरने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. का क्रिडाविषयक सिनेमा आहे. 'तुलसीदास ज्युनिअर' सिनेमात राजीव कपूरसोबत संजय दत्त आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव दिसणार आहे.
'लंडन फाइल्स' ही वेब सीरिज 21 एप्रिलला वूटवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अर्जुन रामपालसोबत पूरब कोहली मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन सचिन पाठक यांनी केले आहे. सपना पब्बी, मेधा राणा, गोपाल दत्त हे कलाकार या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'गिल्टी माइंड्स' ही वेब सीरिज 22 एप्रिलला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये श्रिया पिळगावकर आणि वरुण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. तर शक्ती कपूर, सतीश कौशिक आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे ज्येष्ठ कलाकार या वेबसीरिजमध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन शेफाली भूषण यांनी केले आहे.
25 एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'अनुपमा-नमस्ते अमेरिका' ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये रुपाली गांगुली अनुपमाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही थ्रिलर वेब सीरिज असणार आहे.
संबंधित बातम्या