'अरे भावा... जे तू बोलतोय, ते तुला तरी समजतंय का?'; पहाटे अमिताभ बच्चन यांचं ट्विट कुणासाठी? चाहते कोड्यात
Amitabh Bachchans Cryptic 3 AM Tweet: अमिताभ बच्चन यांनी पहाटे एक ट्विट शेअर केलं आहे. नेटकऱ्यांनी या ट्विटवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.

Amitabh Bachchan viral tweet: बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी एक काळ आपल्या चित्रपटातून तुफान गाजवला. रिअॅलिटी शोमधूनही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. 83 वयातही बिग बी सोशल मीडियात प्रचंड अॅक्टिव्ह असतात. (ट्विटर) एक्सवर आपले पोस्ट आणि विचार मांडत असतात. त्यांचे ट्विट्स म्हणजे जणू एक कोडेच. चाहते तसेच नेटकऱ्यांना कायम विचारात पाडतात. अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या ट्विटने अनेकांना विचारात पाडले आहे. त्यांनी शेअर केलेली ट्विट एक कोडेच बनले आहे. जे कुणीही समजू शकलेलं नाही. नेटकऱ्यांनी या ट्विटवर कमेंट करत, प्रश्नांचा भडिमार केला आहे. अमिताभ बच्चन यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे, पाहूयात.
अमिताभ बच्चन एक्सवर सक्रिय असतात. पण त्यांनी केलेले ट्विट हे कायम कोड्यात टाकतात. त्यांच्या ट्विटवर एक नंबर देखील आपल्याला पाहायला मिळतो. आज पहाटे 3:41 मिनिटांनी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केलीये. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं की, 'T-5687, अरे भावा.. जे तू बोलतोय, ते तुला तरी समजतंय का?', असं ट्विट त्यांनी शेअर केलं. अमिताभ बच्चन यांनी नेमकं कुणाला उद्देशून हे ट्विट शेअर केलं, हे अद्याप कुणालाही समजू शकलेलं नाही.
अमिताभ बच्चन यांचं ट्विट सोशल मीडियात तुफान व्हायरल झालं. नेटकऱ्यांनी या पोस्टवर रिअॅक्शन दिलं. तसेच कमेंट करत काही प्रश्न देखील उपस्थित केले आहे. एकाने लिहिले की, 'अहो काका, आता झोपा..सकाळी सकाळी कशाला कोडे सोडवत आहात'. तर, एका नेटकऱ्याने अगदी मिश्कीलपणे ट्विटला रिप्लाय दिला आहे. 'अमितजी, तुम्ही या गोष्टी थेट तुमच्या पत्नीला सांगू शकता. पहाटे 3 वाजता कोण ट्विट करतं?'
T 5687 - अरे भइया, जो बोल रहे हो, ख़ुद समझ पा रहे हो ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 17, 2026
तर, आणखी एका युझरने, 'अमितजी रात्र झाली आहे. तुम्हाला झोप नाही येत का? एवढ्या रात्री तुम्ही कुणाला समजावून सांगत आहात?', असा ट्विटला रिप्लाय दिला आहे. तर, आणखी एका युझरने, 'आम्ही देखील तुम्हाला तोच प्रश्न विचारुन थकलो आहोत'. तर नेटकऱ्याने थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर सवाल उपस्थित केला आहे. 'हा प्रश्न आमचाही आहे, तुम्ही जे काही लिहिलं आहे, ते तुम्हाला तरी समजतं आहे का सर?'.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी नेमकं ट्विट कुणाला उद्देशून केलं होतं? ट्विट करण्यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न सध्या अजूनही अत्तुरीत आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















