Tunisha Sharma Death : "100 टक्के लव्ह जिहाद"; तुनिषाच्या काकांचा मोठा दावा
Tunisha Sharma : तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या काकांनी मोठा दावा केला आहे.
Tunisha Sharma Death Case : 'अली बाबा-दास्तान ए काबुल' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणारी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिचे काका पवन शर्मा यांनी एक मोठा दावा केला आहे.
तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी हे प्रकरण 100 टक्के लव्ह जिहादचे असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले," तुनिषाची आत्महत्या हे 100 टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे. पोलिसांनी लव्ह जिहादच्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास घ्यावा".
पवन शर्मा पुढे म्हणाले,"तुनिषाची आत्महत्या नक्की कशामुळे या प्रकरणी तपास सुरू आहे. त्यामुळे सखोल तपास न करता तिचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असं पोलीस कसं म्हणू शकतात? अद्याप पोलिसांनी आम्हा कुटुंबियांचा जबाब घेतलेला नाही. पण लवकरच तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की लव्ह जिहादमुळे हे समोर येईल".
तुनिषाचे काका पवन शर्मा यांच्या आधी भाजपचे नेते राम कदम यांनीदेखील याप्रकरणावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते,"आत्महत्येमागे लव्ह जिहाद संघटनेचा हात असेल का? सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून ते तुनिषाच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देतील".
नेमकं प्रकरण काय?
तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
View this post on Instagram
तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती. आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळेच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला असं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या