Tunisha Sharma Death : तुनिषा शर्माच्या आयुष्यातला शेवटचा क्षण समोर; रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती
Tunisha Sharma : तुनिषाच्या आत्महत्येनंतरचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये शिझान तिला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.
Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या आत्महत्येनंतरचा एक व्हिडीओ एबीपी न्यूजच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये शिझान तिला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुनिषा शर्माचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खान तसेच आणखी दोन जण तुनिषाला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तुनिषाला उचलून पायऱ्या चढताना दिसत आहे. त्याच्यासोबत एक महिला आणि शिझानदेखील आहे.
BREAKING NEWS | मौत के बाद तुनिषा का पहला वीडियो सामने आया @ShobhnaYadava | @MrityunjayNews | @surajojhaa https://t.co/smwhXUROiK #BreakingNews #TunishaSharma #TunishaSharmaSuicide pic.twitter.com/nAHWd8TQBb
— ABP News (@ABPNews) December 27, 2022
आत्महत्येनंतर तुनिषाला नायगावमधील एफ अॅन्ड बी रुग्णालयात नेण्यात आले होते. आता या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती लागलं आहे. शिझान मालिकेत साकारत असलेल्या पात्राचे कपडे घालून रुग्णालया गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. तुनिषा सध्या 'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. पण 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. काल (27 डिसेंबर) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय? (Tunisha Sharma Suicide case)
'अलिबाबा: दास्तान ए काबुल' (Ali Baba: Dastaan-E-Kabul) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत तुनिषा शर्मा मुख्य भूमिकेत होती. वसईतील भजनलाल स्टुडियोत या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शनिवारी दुपारी तुनिषाने मेकअप रुममध्ये गळफात घेत आयुष्य संपवलं. संध्याकाळी 5 वाजता ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर तिला वसईतीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तुनिषा अभिनेता मोहम्मद शिझानसोबत रिलेशनमध्ये होती. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाल्याने ती निराश झाली होती. दोन दिवसांपासून ती नैराश्यात होती अशी तक्रार तुनिषाच्या आईने दिली होती. त्या तक्रारीवरून आम्ही शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशीरा अटक केली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या