एक्स्प्लोर
अभिनेते विनोद खन्ना यांच्या रुग्णालयातील व्हायरल फोटोमागील सत्य
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आजारी आहेत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मागील आठवड्यात शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु यादरम्यानच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून प्रत्येक जण स्तब्ध होतो. काही दिवसांपूर्वी आपल्या नेहमीच्या शैलीत दिसणाऱ्या विनोद खन्ना यांना अचानक काय झालं असेल, असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
काही वृत्तानुसार, विनोद खन्ना यांना ब्लॅडर कॅन्सर आहे. मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. “वडिलांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,” असं विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने सांगितलं आहे.
“डॉक्टर आणि रुग्णालयाचा स्टाफचा मी आभारी आहे. त्यांनी वडिलांची अतिशय चांगली काळजी घेतली, असंही राहुल खन्ना म्हणाला. दुसरीकडे विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल,” असं रुग्णालयाने सांगितलं.
70 वर्षीय विनोद खन्ना यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 'दंबग' आणि 'दबंग 2' या सिनेमात अभिनेता सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
अशातच विनोद खन्ना यांच्या नावाने व्हायरल झालेल्या फोटोने चाहतेही हळहळले. या फोटोमध्ये त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत दिसत आहेत.
एबीपी न्यूजने या फोटोमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विनोद खन्ना आजारी असून ते सध्या रुग्णालयात आहेत, असं या पडताळणीत समोर आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.
एबीपी न्यूजने फोटोच्या पडताळणीसाठी राहुल खन्ना यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर आणि रुग्णालयाच्या स्टाफचा मी आभारी आहे. त्यांनी वडिलांची अतिशय चांगली काळजी घेतली, असं राहुल खन्नाने 4 एप्रिल रोजी सांगितलं.
बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली. गरज पडली तर आपण विनोद खन्ना यांच्यासाठी अवयवदानही करु, असं अभिनेता इरफान खानने म्हटलं होतं.
विनोद खन्ना आजारी असून त्यांना डिहायड्रेशनचा त्रास आहे, याला त्यांच्या कुटुंबियांनी दुजोरा दिला. मात्र फोटोबद्दल स्पष्ट बोलण्यास नकार दिला. फोटो चुकीचा असता तर कुटुंबियांनी फोटो त्यांचा नसल्याचं लगेच स्पष्ट केलं असतं. मात्र कुटुंबियांनी या फोटोचं खंडन केलं नाही. त्यामुळे एबीपी न्यूजच्या पडताळणीत हा फोटो खरा असल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या :
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्ना यांचा फोटो व्हायरल
विनोद खन्ना यांची प्रकृती स्थिर, कुटुंबीयांकडून चाहत्यांचे आभार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement