एक्स्प्लोर
फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारी 'ती' कविता गुलजार यांची नाही!

उसे अईलाइनर पसंद था मुझे काजल. वो फ्रेंच टोस्ट और कॉफ़ी पे मरती थी और मैं अदरक की चाय पे. उसे नाईट क्लब्स पसंद थे, मुझे रात की शांत सड़कें. शांत लोग मरे हुए लगते थे उसे, मुझे शांत रहकर उसे सुनना पसंद था. लेखक बोरिंग लगते थे उसे, पर मुझे मिनटों देखा करती, जब मैं लिखता. वो न्यू यॉर्क के टाइम्स स्क्वायर, इस्तांबुल के ग्रैंड बाज़ार में शौपिंग के सपने देखती थी, मैं असम के चाय के बागों में खोना चाहता था, मसूरी के लाल टिब्बे में बैठकर सूरज डूबता देखना चाहता था. उसकी बातों में महंगे शहर थे, और मेरा तो पूरा शहर ही वो. न मैंने उसे बदलना चाहा, न उसने मुझे. अच्छा चला था इसी तरह सब. एक अरसा हुआ, दोनों को रिश्ते से आगे बढे. कुछ दिन पहले उनके साथ ही रहने वाली एक दोस्त से पता चला… वो अब शांत रहने लगीं हैं, लिखने लगीं हैं. मसूरी भी घूम आईं, लाल टिब्बे पर अँधेरे तक बैठी रहीं. आधी रात को अचानक से उनका मन अब, चाय पीने का करता है. और मैं… मैं भी अब अकसर कॉफ़ी पी लेता हूँ, किसी महंगी जगह बैठक. मुंबई : ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध कवी आणि गीतकार यांच्या नावाने ही कविता फेसबुक, व्हॉट्सअॅपवर शेअर केली जात आहे. परंतु ही कविता गुलजार यांची नसून 23 वर्षीय पत्रकार भास्कर त्रिपाठी याची आहे. भास्कर त्रिपाठीने ही कविता एप्रिल 2015 मध्ये त्याच्या प्रोफाईलवर पोस्ट केली होती. पण एका आठवड्यापूर्वी हीच कविता गुलजार यांच्या नावाने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याला धक्काच बसला. कवितेवरुन गोंधळ ही कविता गुलजार यांच्या नावाने पोस्ट होत असल्याचं भास्कर त्रिपाठीच्या एका मित्राच्या लक्षात आलं. त्याने भास्करला याबाबतची माहिती दिली. हे समजल्यानंतर भास्कर निराश झाला. तो म्हणाला की, "मी स्वत: गुलजार यांचा चाहता आहे. शिवाय कोणत्याही लेखक-कवीला त्याच्या लिखाणाचं क्रेडिट दुसऱ्याने घेतलेलं आवडणार नाही. मग ती व्यक्ती भलेही त्याची आदर्श का असेना." भास्कारने यानंतर तातडीने हालचाली केल्या. काही व्यासपीठांना तसंच लेखकांना त्याच्या ओरिजिनल कवितेची लिंक पाठवली. त्यापैकी मराठी लेखक सतिश तांबे यांनी भास्करची कविता त्याच्या नावाने पोस्ट करुन पाठिंबा दर्शवला. यादरम्यान भास्करला काही वाईट अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. काहींनी त्याला 'ठक' म्हणून हिणवलं. गुलजार यांच्याशी संपर्क साधण्याची धडपड यानंतर भास्कर त्रिपाठीने कसाबसा गुलजार यांचे सहाय्यक पवन झा यांच्याशी संपर्क साधून हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणला. गुलजार यांच्या नावाने पोस्ट होणाऱ्या कवितेबाबत झा यांनाही कल्पना होती. इतकंच काय गुलजार यांच्या फॅनपेजवरही ही कविता #NotByGulzar या नावाने पोस्ट झाली होती. स्वत: गुलजारही या ट्रेण्डमुळे त्रासले होते, असंही झा यांनी सांगितलं. भास्कर त्रिपाठीच या कवितेचा मूळ कवी असल्याचं समजल्यानंतर पवन झा यांनी फॅनपेजवर पोस्ट टाकली. त्यात लिहिलं होतं की, "गुलजार यांच्या नावाने आणखी एक #NotByGulzar हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. पण ही कविता भास्कर त्रिपाठीची आहे." कोण आहे भास्कर त्रिपाठी? मूळचा लखनौचा असलेला भास्कर त्रिपाठी हा 'चाय और चकल्लस'चा संस्थापक आणि संपादक आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याने पर्सनल पेज म्हणून याची सुरुवात केली होती. मात्र उदयोन्मुख लेखकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे 'चाय और चकल्लस' एक मोठं व्यासपीठ बनलं आहे. 'चाय और चकल्लस'ची फेसबुक पोस्ट
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























