एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

‘ऑस्कर’ विजेत्या विल स्मिथवर ‘या’ कार्यक्रमाने घातली बंदी!

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने अभिनेता ख्रिस रॉक याला मारलेली थप्पड आता त्यालाच महागात पडत आहे. ‘ऑस्कर’ सोहळ्यात घडलेल्या या प्रकाराला आता अनेक महिने उमटले असले, तरी या प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना पाहायला मिळतायत. याच प्रकरणामुळे एका कार्यक्रमातून अभिनेता विल स्मिथची हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘SNL’ने विल स्मिथवर कायम स्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

'ती मी नव्हेच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'ती मी नव्हेच' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट

दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या किच्चा सुदीप त्याच्या आगामी 'कब्जा' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्रदेखील मुख्य भूमिकेत आहे. 

चंद्रपूरमध्ये 'झाडीपट्टी' नाट्य संमेलनाला सुरुवात

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत. 

'नेने वस्थुन्ना'मध्ये धनुष दिसणार दुहेरी भूमिकेत

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे. 

वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या आठवड्यात तीन मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. तर 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यामुळे प्रेक्षकांना या वीकेंडला मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या वीकेंडला प्रेक्षक 'ब्रह्मास्त्र', 'बॉईज 3', 'भाऊबळी','रुप नगर के चीते' हे सिनेमे पाहू शकतात.

'राडा' चित्रपटातील धमाल गाण्यावर हिना पांचाळ धरायला लावणार ठेका!

साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. अशातच चित्रपटातील एक नवं कोरं 'मैनाचा पोपट झाला' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'राडा' चित्रपटातील या आयटम साँगमध्ये आपले सर्वांचे लाडके मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरणार आहे.

‘ऑस्कर’मध्येही दिसू शकते ‘आरआरआर’ची जादू

अभिनेता राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट्ट स्टारर ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम केली होती. आता मात्र चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता चित्रपट ऑस्करवारी करू शकतो, असे म्हटले जात आहे. या चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. दरम्यान, आता ‘आरआरआर’ ऑस्करच्या यादीत सामील होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऑस्करच्या शर्यतीत दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या या चित्रपटाच्या नावाची चर्चा आहे.

'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकरची चित्रपटात एन्ट्री

‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे प्रसिद्ध झालेला विनोदवीर नवीन प्रभाकर आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आगामी ‘आपडी थापडी’ या मराठी चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार टॉकीज प्रिमिअर

 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आता या सिनेमाचा टॉकीज प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवणारा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget