एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतळी चितळेला अटक करण्यात आली. तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) लावल्यावरुन आता पोलीस अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला आहे.

सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचा नवा विक्रम, ‘बिलबोर्ड 200’च्या यादीत ‘295’ला मिळाले मानाचे स्थान!

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग देशातच नाही, तर परदेशातही आहे. आता सिद्धू मूसेवालांच्या '295' या गाण्‍याने जागतिक ‘बिलबोर्ड 200’च्‍या यादीमध्‍ये स्‍थान निर्माण केले आहे. मात्र, हे यश पाहायला सिद्धू आज आपल्यात नाहीत.  या विक्रमानंतर चाहते त्‍यांची आठवण करून भावूक होत आहेत आणि सोशल मीडियावर आपल्‍या प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सिद्धू मूसेवाला यांचे ‘295’ हे गाणे जागतिक बिलबोर्ड यादीत 154व्या क्रमांकावर आहे.

अजिंक्य राऊत-शिवानी बावकरची जमली जोडी! ‘नाते नव्याने’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या एव्हरेस्ट म्युझिकने ‘नाते नव्याने’ हे ‘थोडे अलवारसे, थोडे हळुवारसे...’ या मुखडयाचे प्रेमगीत प्रदर्शित केले असून, एव्हरेस्ट म्युझिकच्या युट्युबवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या गाण्यात टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कलाकार अजिंक्य राऊत - शिवानी बावकरची जोडी जमली आहे.

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. बदलापूरच्या भारती दबडे यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आयुष्यातली पहिली कमाई केली आहे. ज्ञानाच्या साथीनं सर्वकाही शक्य आहे हे त्यांनी त्यांच्या खेळातून प्रेक्षकांना दाखवून दिलं आहे.

सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश

प्रविण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना टक्कर दिली आहे. आता या सिनेमाने चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅठफॉर्मवर प्रदर्शित होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

बोमन ईरानी करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. बोमन ईरानीची 'मासूम' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 17 जूनला ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 

'अनेक' नेटफ्लिक्सवर होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा  'अनेक' सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने नुकतीच यासंदर्भात माहिती दिली आहे. 

राजकुमार रावच्या 'हिट'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राजकुमारचा 'हिट- द फर्स्ट केस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा रहस्यमय टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात राजकुमारसोबत सान्य मल्होत्रादेखील  दिसणार आहे.

रणबीर कपूरच्या 'शमशेरा'चे पोस्टर लीक; दमदार लूक सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'शमशेरा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज होण्याआधीपासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमात रणबीरसोबत संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. आता या सिनेमाचे पोस्टर लीक झाले आहे. सोशल मीडियावर रणबीरचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या सिनेमात रणबीरचा दमदार लूक पाहायला मिळणार आहे.

Nishikant Kamat यांच्या आठवणीत पार पडला 'Ruiank'नाट्यमहोत्सव; सेलिब्रिटींची हजेरी

महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. कोरोना महामारीमुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने एकांकिका स्पर्धा होऊ लागल्या आहेत. नुकताच रुईया महाविद्यालयाचा 'रुईयांक' हा नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणारSolapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget