एक्स्प्लोर

सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम

येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'.

मुंबई: मराठी विरुद्ध हिंदी सिनेमा वादात आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. संजय निरुपम यांनी थेट थिएटर मालकांची बाजू घेत पुन्हा मनसे विरोधात दंड थोपटले आहेत. संजय निरुपम यांनी ट्विट करुन मनसेला पुन्हा ललकारलं आहे. “मराठी सिनेमाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, मात्र त्याच्या नावे मनसेची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांनी ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सुरक्षा द्यावी. तसंच मनसेच्या गुंडांविरोधात लढण्यासाठी थिएटर मालकांना बाऊन्सर्स/ सुरक्षा रक्षक ठेवण्याची परवानगी द्यावी”, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. नेमका काय आहे वाद? येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे. मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर 5 खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे  देवा आणि गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवाची मनसेकडे धाव या प्रकारामुळे ‘देवा’च्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतल्यानंतर मनसेने देवाला जागा देण्यास थिएटर मालकांना बजावलं आहे. ‘देवा’च्या टीमने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. यानंतर देवा या मराठी चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास मनसे स्टाईनने आंदोलनाचा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला आहे. नितेश राणेंचा इशारा दरम्यान, या वादात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली. महाराष्ट्रात ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर ते थिएटरर्स ना कुठलाच टायगर वाचू शकणार नाही!!  असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिला आहे. महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असंही त्यांनी निक्षून सांगितलंय. संजय राऊत "देवा"चं काय. प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे., असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.   संबंधित बातम्या 'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget