Tiger 3 Advance Booking : सलमान खानच्या 'टायगर 3'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; दिवाळीत भाईजानची धमाकेदार एन्ट्री
Tiger 3 : सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
Salman Khan Tiger 3 Advance Booking : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. दिवाळीत धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी भाईजान सज्ज आहे.
'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) मुख्य भूमिकेत आहेत. इमरान या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 'टायगर 3' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या ट्रेलरमध्ये कतरिना आणि सलमानचा अॅक्शन मोड पाहायला मिळाला.
'या' दिवशा सुरू होणार 'टायगर 3'चं अॅडव्हास बुकिंग
'टायगर 3' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 5 नोव्हेंबर 2023 रोजी सुरुवात होणार आहे. सलमानचा 'टायगर 3' हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान'चा (Jawan) रेकॉर्ड ब्रेक करणार का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर 3 या सिनेमाच्या प्रमोशनला अद्याप सलमान खान किंवा कतरिनाने सुरुवात केलेली नाही.
SALMAN KHAN - TIGER & THE FESTIVAL CONNECTION…
— taran adarsh (@taran_adarsh) October 30, 2023
⭐️ #EkThaTiger - the first film in #YRFSpyUniverse - released on #Eid.
⭐️ The second instalment - #TigerZindaHai - arrived on #Christmas.
⭐️ #Tiger3 - the much-awaited third part - is all set for #Diwali release.
The countdown has… pic.twitter.com/ihADCyha3F
'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने सांभाळली आहे. या सिनेमात सलमान आणि कतरिनासह इमरान, रिद्धी डोगरा, कुमुद मिश्रा, रेवती आणि अनन्त विदात हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.
'टायगर 3'कधी होणार रिलीज? (Tiger 3 Release Date)
'टायगर 3' या सिनेमाची सिनेरसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ ही रुपेरी पडद्यावरची सुपरहिट जोडी आहे. त्यांना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी आणि चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. आता टायगर 3 च्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवण्यासाठी ते सज्ज आहेत.
'टायगर 3' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनीष शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'टायगर 3' या सिनेमात सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 2023 वर्षातला सलमानचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या