एक्स्प्लोर
Advertisement
'ठग्ज...' ने तीन दिवसांत केली बक्कळ कमाई
आमीर खानचा बहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली असली तरी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बरी कमाई केली आहे.
मुंबई : आमीर खान आणी अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षीत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाची समीक्षकांनी मोठ्या प्रमाणात निंदा केली असली तरी, आमीरच्या चाहत्यांनी समीक्षकांना चांगलेच उत्तर दिले आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ने पहिल्याच दिवशी तब्बल 52.25 कोटी रुपयांची केल्यानंतर तीन दिवसांमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
आमीरच्या 'ठग्ज'ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर या चित्रपटावर आणि चित्रपट पाहणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक 52 कोटी रुपयांची कमाई करुनही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन निम्म्याहूनही कमी झाले आहे.#ThugsOfHindostan HINDI: Thu 50.75 cr, Fri 28.25 cr, Sat 22.75 cr. Total: ₹ 101.75 cr TAMIL + TELUGU: Thu 1.50 cr, Fri 1 cr, Sat 75 lakhs. Total: ₹ 3.25 cr Total: ₹ 105 cr [5000 screens] India biz.#TOH
— taran adarsh (@taran_adarsh) November 11, 2018
ठग्जने शुक्रवारी 28.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शनिवारी चित्रपट अजून घसरला आहे. शनिवारी चित्रपटाने 22.75 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाला तमिळ आणि तेलुगू भाषेतदेखील बरा प्रतिसाद मिळत आहे.#ThugsOfHindostan decline in biz... Fri [vis-à-vis Thu]: 44.33% Sat [vis-à-vis Fri]: 19.47% Hindi version... India biz.#TOH
— taran adarsh (@taran_adarsh) November 11, 2018
The DOWNFALL continues... #ThugsOfHindostan gets weaker with each passing day... With biz declining further on Day 3 [Sat], the writing is clear on the wall... Will find it tough to sustain from Day 5 [Mon] onwards... #TOH
— taran adarsh (@taran_adarsh) November 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement