![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Vaccine War OTT Release : बॉक्स ऑफिसवर आपटलेला विवेक अग्निहोत्राचा 'द व्हॅक्सिन वॉर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
![The Vaccine War OTT Release : बॉक्स ऑफिसवर आपटलेला विवेक अग्निहोत्राचा 'द व्हॅक्सिन वॉर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल The Vaccine War OTT Release when and where to watch the Vivek Agnihotri Movie Know about film bollywood Entertainment Latest Update The Vaccine War OTT Release : बॉक्स ऑफिसवर आपटलेला विवेक अग्निहोत्राचा 'द व्हॅक्सिन वॉर' ओटीटीवर रिलीज; जाणून घ्या कधी कुठे पाहता येईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/ece7bc04bb9a0c0b985fce06fee074351700817153242254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
The Vaccine War OTT Release : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता सिनेमागृहात रिलीज झाल्याच्या दोन महिन्यानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.
नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. आता ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. ओटीटीवर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'द व्हॅक्सीन वॉर' या सिनेमाचे ओटीटी राइट्स विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. नाना पाटेकरांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत 'द व्हॅक्सिन वॉर' ओटीटीवर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
'द व्हॅक्सिन वॉर' कुठे पाहता येईल?
'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे आता तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा प्रेक्षक घरबसल्या पाहू शकतात.
'द व्हॅक्सिन वॉर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (The Vaccine War Box Office Collection)
'द व्हॅक्सीन वॉर' हा सिनेमा 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाप्रमाणे कमाई करू शकलेला नाही. रिलीजच्या 22 दिवसांत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 10.33 कोटी रुपयांची कमाई केली. तर जगभरात 14 कोटींचा गल्ला जमवला. आता ओटीटीवर या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'द व्हॅक्सीन वॉर' या सिनेमात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, राइमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा, मोहन कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात आयसीएमआर (ICMR) आणि एनआयवीचे (NIV) डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांचा व्हॅक्सिन बनवण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. भारतात हा सिनेमा 1000 स्क्रीनवर रिलीज झाला होता.
संबंधित बातम्या
The Vaccine War Review: कसा आहे विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर? वाचा रिव्ह्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)