(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Secrets of Gavaskar : 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेब सीरिजची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी; कलाकारांनी लावली हजेरी
'सिक्रेट ऑफ गावस्कर' (Secrets of Gavaskar) या वेबसीरिजमधील कलाकारांनी साजरी केली सक्सेस पार्टी.
Secrets of Gavaskar : क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचा कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' (Secrets of Gavaskar) ही नवीकोरी वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधितच या वेबसिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. 'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'व्हीमास मराठी' प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि अॅक्शनचा भरणा असलेली वेबसिरीज 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या वेबसिरीजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली याचे औचित्य साधत 'सिक्रेट ऑफ गावस्कर' या वेबसिरीजच्या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन करण्यात आले.
अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळालं. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय. दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित लेखक अजिंक्य ठाकूर लिखित ही वेबसिरीज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.
View this post on Instagram
'व्हीमास मराठी'च्या 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेबसिरीजच्या टीमने त्यांच्या यशाचे हे क्षण धुमधडाक्यात साजरे केले.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: