Sara Ali Khan : 'या' क्रिकेटरला डेट करतीये सारा? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Sara Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. कॉफी विथ करण या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबाबत सांगितलं होतं. पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. साराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सारा आणि शुभमन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये शुभमन आणि सारा हे एकत्र दिसत आहेत. 'शुभमन गिल हा सारा अली खानला डेट करत आहे आणि आपण दुसऱ्याचं साराचा विचार करत होतो.' असं कॅप्शन व्हायरल व्हिडीओला दिलेलं आहे. सचिन तेंडूलकर यांची मुलगी सारा तेंडूलकरसोबत देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. तर सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती. अजून सारा आणि शुभमन यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ:
Shubman gill date sara ali khan ko kar eha tha aur hum kisi aur hi sara ko lapet rhe the🥲#Shubmangill #CricketTwitter pic.twitter.com/oEAAXqXgOz
— Arun (@ArunTuThikHoGya) August 29, 2022
सारा आणि शुभमन हे दोघे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. शुभमन हा क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. तर सारा ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबाबत जाणून घेण्यास त्यांचे चाहते उत्सुक आहेत.
साराचे आगामी चित्रपट
साराचा 'गॅसलाइट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या आतरंगी रे, लव आज कल,सिम्बा, केदारनाथ या साराच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:























