Tejas : पंगाक्वीनचे चाहते नाराज; कंगना रनौतच्या 'तेजस' ची रिलीज डेट पुढे ढकलली
Tejas : कंगना रनौतच्या आगामी 'तेजस' सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
Tejas : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या आगामी 'तेजस' (Tejas) सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सिनेमा पुढील वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कंगना रनौतचा 'तेजस' सिनेमा 5 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. सिनेमा अद्याप पूर्णपणे तयार न झाल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता हा सिनेमा जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
View this post on Instagram
'तेजस' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सर्वेश मेवाडने सांभाळली आहे. तर सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाची निर्मिती केलेल्या 'आरएसवीपी' या निर्मिती संस्थेनेच या सिनेमाचीदेखील निर्मिती केली आहे. 'तेजस' सिनेमात कंगना वैमानिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
'धाकड' सिनेमानंतर कंगनाचा 'तेजस' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. धाकड चित्रपटात कंगना एका गुप्तहेराच्या भूमिकेत होती. कंगना 'द इनकार्नेशन ऑफ सीता' या पौराणिक चित्रपटातदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमावरदेखील कंगनाचे काम सुरू आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या