Alia Bhatt Instagram : आलियानं दीपिका-कतरिनाला टाकलं मागे; इंस्टाग्रामवर पार केला 70 मिलियनचा टप्पा
Alia Bhatt : आलिया भट्ट इंस्टाग्रामर खूप अॅक्टिव्ह असते. आता आलियाने इंस्टावर 70 मिलियनचा टप्पा पार केला आहे.
Alia Instagram Followers : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर आलिया भट्ट चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आता आलियाने कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणला मागे टाकलं आहे. आलियाने इंस्टाग्रामवर 70 मिलियनचा टप्पा पार केला आहे.
आलिया भट्ट इंस्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन झाली आहे. दीपिकाचे इंस्टाग्रामवर 68.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दीपिकाला 66.7 मिलियन मंडळी फॉलो करतात. आलिया भट्टने कतरिना आणि दीपिकाला मागे टाकलं असलं तरी अद्याप तिने प्रियंका चोप्रा आणि श्रद्धा कपूरला मागे टाकलेलं नाही. प्रियंकाचे इंस्टाग्रामवर 81.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर श्रद्धाला 74.4 मिलियन फॉलो करतात.
आलियाचा ब्रम्हास्त्र 9 सप्टेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
View this post on Instagram
अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने सर्वाधिक व्ह्यूजचा रेकॉर्ड केला आहे. अरिजीत सिंहने हे गाणं गायलं आहे. तर प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. तसेच या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.
संबंधित बातम्या