The Kerala Story Twitter Review: ‘द केरळ स्टोरी’ जिंकतोय प्रेक्षकांची मनं; चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणतायत, 'प्रपोगंडा नाही तर...'
अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.
The Kerala Story Twitter Review: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट आज (5 मे) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही लोकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली होती. पण आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या चित्रपटाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे? ते जाणून घेऊयात...
एका नेटकऱ्यानं 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या रिव्ह्यूमध्ये त्यानं लिहिलं, "द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा एक भाग होण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला लकी समजतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. मी प्रत्येक भारतीयाला हा चित्रपट पाहण्याची आणि जनजागृती करण्याची विनंती करतो. इतका धाडसी चित्रपट बनवल्याबद्दल विपुल शाह जी आणि सुदिप्तो सेन जी तुमचे आभार."
Lucky to be a part of a special screening of #TheKerelaStory organised by @CAPratikKarpe ji which is based on true events...I recommend every Indian to watch this movie and spread awareness...Kudos to @VipulAlShah ji & @sudiptoSENtlm ji for making such a bold movie pic.twitter.com/r0lmOnqa5K
— Proud indian (@SAI19RAM) May 5, 2023
'हे केरळचेच नव्हे तर आपल्या समाजाचे काळे सत्य आहे! हा चित्रपट अवश्य पहा.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे.
#TheKeralaStory
— Aditya Swarup Sahu 🇮🇳🚩 (@SirAdityaSwarup) May 5, 2023
is not only a stroy of Kerala, It's a dark Truth of our Society ! Must watch movie... @sunshinepicture#TheKeralaStoryReview pic.twitter.com/BszTo5g7ub
एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, 'नुकताच 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रपोगंडा नाही तर हा सत्य कथेवर आधारित आहे. अनेकांनी हे मान्य केले आहे.'
Just watched #TheKeralaStory
— 🅴🆇🇮🇳 (@Ex_NRI) May 5, 2023
The film “The Kerla Story” is not a propaganda. It’s based on real story. Many newspapers, reports, courts have accepted this. #MustWatch 🙏🏻🙏🏻#TheKeralaStory #TheKeralaStoryReview pic.twitter.com/RD3Bdzoey6
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: