Adah Sharma: 'केरळमधील 32000 मुलींची कथा'; 'The Kerala Story' चा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.या टीझरमधील अदा शर्माच्या (Adah Sharma) डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
The Kerala Story: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. अदानं या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमधील अदाच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचे कथानक हे केरळमधील काही मुलींच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
टीझरमध्ये दिसत आहे की अदा शर्मा म्हणते,'माझं नाव आधी शालिनी उन्नीकृष्णन होते. मला नर्स होऊन लोकांची सेवा करायची होती. आता माझं नाव फातिमा बा आहे. मी आतंकवादी आहे. मी सध्या अफगाणिस्तान जेलमध्ये आहे. मी एकटी नाहीये माझ्या सारख्या 32 हजार मुली आहेत.' 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा हा टीझर रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
'हृदय पिळवटून टाकणारी केरळमधील 32000 मुलींची कथा!' असं कॅप्शन अदा शर्मानं टीझरला दिलं आहे. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. तर विपुल अमृतलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या या चित्रपटाचा 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
पाहा टीझर:
Heart breaking and gut wrenching stories of 32000 females in Kerala!#ComingSoon#VipulAmrutlalShah @sudiptoSENtlm @adah_sharma @Aashin_A_Shah#SunshinePictures #TheKeralaStory #UpcomingMovie #TrueStory #AdahSharma pic.twitter.com/M6oROuGGSu
— Adah Sharma (@adah_sharma) November 3, 2022
टीझर वादाच्या भोवऱ्यात
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर केरळ राज्याची बदनामी केल्याचा आरोप होत आहे. तर काही लोक टीझरमधील सांगण्यात आलेल्या मुलींच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
अभिनेत्री अदा शर्मानं 1920 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला. हसी तो फसी, कमांडोः2, कमांडो 3 या चित्रपटांमध्ये अदानं काम केलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: