The Kerala Story Box Office Collection : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर यशस्वी; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला आपली जादू दाखवण्यात यश आलं आहे.
The Kerala Story Box Office Collection : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा बहुचर्चित सिनेमा सध्या चर्चेत आहे. नुकताच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीच या सिनेमावर प्रचंड विरोध होत होता. पण वादाच्या भोवऱ्यात अकडलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे.
'द केरळ स्टोरी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (The Kerala Story Box Office Collection)
सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. एकीकडे सिनेप्रेमी या सिनेमाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काही मंडळी या सिनेमावर टीका करत आहेत. पण तरीही रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 7.5 कोटींची कमाई केली आहे. वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'द केरळ स्टोरी'
'द केरळ स्टोरी' या सिनेमातील सर्वच कलाकारांनी दर्जेदार काम केलं आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाहने केली आहे. या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma) मुख्य भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अदा शर्मासह या सिनेमात योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती 30 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'द केरळ स्टोरी' 3 ते 5 कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. पण त्यामुळे जास्तच गल्ला या सिनेमाने जमवला आहे. मुस्लिम समाज 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथानकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हटलं जात आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा आहे.
'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रपोगंडा म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना निर्माते विपुल शाह म्हणाले की,"द केरळ स्टोरी' हा प्रपोगंडा असल्याचं म्हणण खूप सोपं आहे. पण या सिनेमावर टीका करणाऱ्यांनी मुळातच हा सिनेमा पाहिलेला नाही. सिनेमा न पाहताच ते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.
संबंधित बातम्या