एक्स्प्लोर

Telly Masala : 'फँड्री' फेम शालू अन् जब्याच्या हळदीनंतर लग्नाचा फोटो समोर ते निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही 'सिंघम अगेन'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rajeshwari-Somnath Wedding : आधी हळदीची चर्चा, आता थेट शेअर केला लग्नाचा फोटो; 'फँड्री' फेम शालू अन् जब्याचं शुभमंगल सावधान?

Rajeshwari Kharat-Somnath Awaghade Wedding Rumors : दिग्दर्शक नागरात मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात  आणि अभिनेता सोमनाथ अवघडे यांना प्रसिद्धी मिळाली. अस्सल मातीतील फँड्री चित्रपट फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात गाजला. या चित्रपटात जब्याची भूमिका साकारणारा अभिनेता सोमनाथ अवघडे आणि शालूची भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजेश्वरी खरातने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर सोमनाथ अवघडेसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी लग्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

दोन अफेयर अन् रेखासोबत गुपचूप लग्न, 'या' सुपरस्टारने चार वेळा केलं लग्न; तरीही नशीबी आला एकांतवास

Vinod Mehra life Story : बॉलिवूडमध्ये 70 च्या दशकात एका चॉकलेट बॉयची खूप चर्चा होती. 70 च्या दशकातील हा चॉकलेट बॉय म्हणजे विनोद मेहरा. 70 ते 80 च्या दशकातील सर्वात हँडसम अभिनेत्यांमध्ये विनोद मेहरा यांचा समावेश होता. त्यांनी बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली आणि अभिनय तसेच मेहनतीच्या जोरादवर बॉलिवूडचा सुपरस्टार बनले. विनोद मेहरा यांनी 1950 मध्ये बालकलाकाराच्या रुपात काम केलं. त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये मोठ्या पडद्यावर चॉकलेट बॉय म्हणून पदार्पण केलं आणि सर्वांना वेड लावलं. त्यांची रंजक कहाणीस वाचा.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : जान्हवी किल्लेकरचं खास दिवाळी सेलिब्रेशन, लक्ष्मीपुजनानिमित्त सासूसोबतचा खास व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांकडून कौतुक

Jahnavi Killekar Diwali Celebration : सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीही धूमधडाक्यात दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरही यात मागे नाही. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली होती. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला जान्हवी चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे तिला प्रेक्षकांचा रोष स्वीकारावा लागला, पण त्यानंतर तिने तिची चूक सुधारत घरातील सर्वांशी चांगले संबंध जुळवत प्रेक्षकांचं मन जिंकलं. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतरही जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत जोडलेली राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात 2 वाईल्डकार्ड एन्ट्री होणार! दोघांची स्टेजवरच वादावादी, ठणाणा ऐकून सलमानही त्रासला

Bigg Boss 18 Wildcard Entry: बिगबॉसच्या सिझन 18 ला सुरु होवून एक महिनाही पूर्ण झाला नाही तोच आता बिग बॉसच्या घरात एक नाही तर दोन वाईल्डकार्ड एन्ट्री होणार आहेत. स्प्लिट्सविला या रिएलिटी शोमध्ये दिसलेले हे दोघेजण आता वाईल्डकार्ड एन्ट्रीलाच एकमेकांशी वादावादी करताना दिसत आहेत. नुकताच या वाईल्डकार्ड एन्ट्रीचा प्रोमोही कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत पेजवरून समोर आणला आहे. यांचा आविर्भाव पाहून सलमानसहीत घरातील सदस्यही अस्वस्थ झालेले दिसतात. बिगबॉस या शोचा TRP वाढवण्यासाठी या दोघांना वाईल्डकार्ड एन्ट्री देण्यात येणार आहे. पण हे दोघे कोण आहेत? जाणून घेऊया..

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bhool Bhulaiya 3 Review : 'भूल भुलैया 3' कुटुंबासोबत पाहता येणारा चित्रपट, कार्तिक आर्यनसोबत विद्या बालन-माधुरी दीक्षित चित्रपटाचा आत्मा

Bhool Bhulaiya 3 Movie Review in Marathi : कार्तिक आर्यन सोबत भूल भुलैया 3 चित्रपटाचा आत्मा म्हणजे विद्या बालन आणि माधुरी दीक्षित आहे. खराब सुरुवातीनंतर चित्रपट पुढे जबरदस्त मनोरंजन करतो. वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Singham Again Movie Review : रामायणात फसलेला रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन'

Singham Again Movie Review in Marathi : सिंघम अगेन चित्रपट लवकरच ओटीटीवर दिसेल, त्यामुळे यासाठी महागडे तिकिट खरेदी करून लक्ष्मी वाया घालवायची की नाही हा विचार प्रेक्षकांनी करावा. वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Singham Again BO Collection Day 1 : निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही 'सिंघम अगेन'ची बॉक्स ऑफिसवर बाजी, भुल भुलैया 3 ला मागे टाकत कमावले 'इतके' कोटी

Singham Again Box Office Collection : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सिंघम अगेन चित्रपट थिएटरमध्ये धमाका करण्याची अपेक्षा होती आणि तसंच घडताना दिसत आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण, त्याला समीक्षकांकडन नकारात्मक प्रतिसाद मिळाला. सिंघम अगेन चित्रपटाला समीक्षकांकडून निगेटिव्ह रिव्ह्यूज मिळाले. असं असूनही, सिंघम अगेन चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 3' ला मात दिली आहे. याचा अंदाज तुम्ही सिंघम अगेनच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून लावू शकता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget