Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात 2 वाईल्डकार्ड एन्ट्री होणार! दोघांची स्टेजवरच वादावादी, ठणाणा ऐकून सलमानही त्रासला
बिगबॉस या शोचा TRP वाढवण्यासाठी या दोघांना वाईल्डकार्ड एन्ट्री देण्यात येणार आहे. पण हे दोघे कोण आहेत? जाणून घेऊया..
![Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात 2 वाईल्डकार्ड एन्ट्री होणार! दोघांची स्टेजवरच वादावादी, ठणाणा ऐकून सलमानही त्रासला Bigg Boss 18 wild card Entry 2 contestants will enter in bigg boss house 2 Wildcards Enter Amid Heated Argument on Stage Salman Shocked Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात 2 वाईल्डकार्ड एन्ट्री होणार! दोघांची स्टेजवरच वादावादी, ठणाणा ऐकून सलमानही त्रासला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/02/2814aa6ea9d3205a034f2a14e9ed094417305196840731063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 18 Wildcard Entry: बिगबॉसच्या सिझन 18 ला सुरु होवून एक महिनाही पूर्ण झाला नाही तोच आता बिग बॉसच्या घरात एक नाही तर दोन वाईल्डकार्ड एन्ट्री होणार आहेत. स्प्लिट्सविला या रिएलिटी शोमध्ये दिसलेले हे दोघेजण आता वाईल्डकार्ड एन्ट्रीलाच एकमेकांशी वादावादी करताना दिसत आहेत. नुकताच या वाईल्डकार्ड एन्ट्रीचा प्रोमोही कलर्स टीव्हीने आपल्या अधिकृत पेजवरून समोर आणला आहे. यांचा आविर्भाव पाहून सलमानसहीत घरातील सदस्यही अस्वस्थ झालेले दिसतात. बिगबॉस या शोचा TRP वाढवण्यासाठी या दोघांना वाईल्डकार्ड एन्ट्री देण्यात येणार आहे. पण हे दोघे कोण आहेत? जाणून घेऊया..
कोणाची होणार वाइल्डकार्ड एन्ट्री?
हिंदी टेलिव्हिजनमध्ये अनेकांच्या आवडीचा शो स्प्लिस्टविला हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या शोमध्ये दिसलेले कशिश कपूर आणि दिग्विजय सिंह राठी हे दोघे आता बिगबॉसच्या घरात दणक्यात एन्ट्री घेणार आहेत. सलमान खान या विकेंड का वारमध्ये या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची नावं घेतो. स्टेजवर येताच जुन्या शोवरून दोघांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसतं. शेवटी तुमचं झालं का? असं सलमानलाच विचारावं लागतं. या वाईल्डकार्ड एन्ट्रीची चर्चा प्रोमोपासूनच सुरु झाली असून या दोघांचा गेम पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सूक असल्याचं दिसतंय.
माझ्यामुळे तु आता इथे आहेस...
दिग्विजय सिंग आणि कशिश कपूर या दोघांमध्ये भर स्टेजवर सलमानसमोरच तु तु में में झाल्याचं पाहायला मिळालं. माझ्यामुळं तू आता या शो मध्ये दिसतोयस. असं दोघेही एकमेंकांना म्हणतायत.. तर दिग्विजय ही निगेटीव्ह एनर्जी मला नकोय असं म्हणाला. तर कशिश कपूर म्हणाली तुझी दोरी आधीही माझ्या हातात होती.. दोघांचे भांडणं पाहून सलमानला शेवटी मधे पडावं लागलं. तुमचं झालं का असं त्यानं विचारलं त्यावरही हे दोघे थांबले नाहीत. त्यावरही या दोघांनी एकमेकांना सुनावलं.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया काय?
ही वाईल्डकार्ड एन्ट्री बिगबॉसच्या घरात वादग्रस्त ठरणार यात काहीच शंका नाही. प्रेक्षकांनी या वाईल्डकार्ड एन्ट्रीच्या प्रोमोवर अनेक मजेशीर कमेंटस केल्या. दिग्विजय कशीशच्या भांडणात सलमानचा झालेला चेहरा पाहून नेटकऱ्यांना हसू फुटलंय. अनेकांनी सलमाननं प्रेक्षकांना काय वाटतंय तेच भाव दाखवल्याचं म्हणलंय. तर अनेकांनी या दोघांचा गेममध्ये कसा परफॉरमन्स राहणार हे पाहण्यासारखं असेल असं म्हणलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)