एक्स्प्लोर

Telly Masala : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू ते श्रेया बुगडेचे छोट्या पडद्यावर कमबॅक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Serial Updates Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' नंतर श्रेया बुगडेचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' शोमध्ये दिसणार नव्या भूमिकेत

Marathi Serial Updates Shreya Bugde :  'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya) हा कॉमेडी शो बंद झाल्यानंतर आता त्यातील कलाकार आता पुन्हा नव्याने कमबॅक करत आहेत. काही  कलाकारांनी 'झी मराठी'ची साथ सोडत दुसऱ्या चॅनेलवरील मालिका, शोमध्ये काम करण्यास  सुरुवात केली आहे. भारत गणेशपुरे यांनी 'झी मराठी'वरील 'शिवा' मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता श्रेया बुगडेही (Shreya Bugde) कमबॅक करत आहे. चला हवा येऊ द्यानंतर श्रेया बुगडे काय करणार, याची चर्चा सुरू होती. आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. श्रेया बुगडे आता 'झी मराठी'वरच (Zee Marathi)  कमबॅक करत आहे. नव्या भूमिकेत श्रेया दिसणार आहे. त्याशिवाय, अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) नव्या भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Noor Malabika Das Actress Dies : काजोलसोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीचा मृत्यू, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Noor Malabika Das The Trial and Ullu app Actress : अभिनेत्री काजोलची (Kajol) मु्ख्य भूमिका असलेल्या  'द ट्रायल' या वेब सीरिजमधील अभिनेत्री नूर मालाबिका दास (Noor Malabika Das) हिचा मृतदेह आढळून आला. अभिनेत्रीने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. नूर मालाबिका दासच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पोस्टमार्टेमनंतर तिच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. नूरने उल्लू अॅपवरील काही वेब सीरिजमध्ये काम केले होते. नूर मालाबिका दास ही 37 वर्षांची होती.  6 जूनच्या आसपास तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड जहीरसोबत अडकणार लग्नबंधनात; 'हीरामंडी' टीमची विशेष उपस्थिती

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : 'हीरामंडी' (Heeramandi) या वेबसीरिजमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री आपला बॉयफ्रेंड जहीर इकबालसोबत (Zaheer Iqbal) येत्या 23 जूनला लग्नबंधनात अडकू शकते. रिपोर्टनुसार, सोनाक्षी आणि जहीर खाजगी पद्धीतीत लग्नबंधनात अडकणार आहेत. निवडक पाहुण्यांना या लग्नसोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. सोनाक्षीच्या लग्नसोहळ्याला 'हीरामंडी' (Heeramandi) सीरिजच्या संपूर्ण टीमची विशेष उपस्थिती असणार आहे. अद्याप लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ind Vs Pak : भारताचा पाकिस्तानवर विजय! अमिताभ बच्चन ते वरुण धवन; बॉलिवूडमध्ये जल्लोष

T20 World Cup 2024 : भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात (Ind Vs Pakistan T20 World Cup 2024) सलग दुसरा विजय साजरा केला. भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून धर्म आहे. प्रत्येक सामन्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता असते. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवण्याने सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील टीम इंडियाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anuradha Paudwal : धक-धक करने लगा; लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अनुराधा पौडवाल यांच्या करिअरला लागला ब्रेक; कारण होत्या लता मंगेशकर?

Anuradha Paudwal Untold Story : लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी 80-90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. रोमँटिक गाणं असो किंवा भजन सर्वच गाणी अनुराधा यांनी खूप चांगल्याप्रकारे गायली आहेत. आजही रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा अनुराधा पौडवाल हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या सुपरहिट गाण्यांसाठी त्यांना ट्रिब्यूट दिलं जातं. अनुराधा यांची गाणी सदाबहार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 13 February 2025 : ABP MajhaHarshwardhan Sapkal :  हर्षवर्धन सपकाळ Maharashtra Congress President , नाना पटोलेंना डच्चूABP Majha Headlines : 09 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
New Income Tax Bill 2025 : बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
बजेटमधील 12 लाखांच्या करमुक्तीनंतर लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर; सर्वसामान्यांसाठी नेमकं काय बदलणार?
INDIA Alliance : पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
पीएम मोदी 26 टक्क्यांनी पुढे, पण किती टक्के लोकांना देशात आजही इंडिया आघाडी हवी? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर!
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
रक्तानं माखलेली तलवार घेऊन आरोपी पोलिस स्टेशनमध्ये, पोलिसही आवाक, धक्कादायक घटनेनं सातारा हादरलं
Beed Crime: संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
संध्याकाळी ट्युशनवरुन मुलांना घरी सोडलं, रात्री रक्त सांडलेली बाईक सापडली, महादेव मुंडेंचा शेवट कसा झाला?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.