Anuradha Paudwal : धक-धक करने लगा; लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अनुराधा पौडवाल यांच्या करिअरला लागला ब्रेक; कारण होत्या लता मंगेशकर?
Anuradha Paudwal Untold Story : लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांनी करिअर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सोडलं होतं. आजवर त्यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
Anuradha Paudwal Untold Story : लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी 80-90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अनुराधा पौडवाल यांनी आपल्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. रोमँटिक गाणं असो किंवा भजन सर्वच गाणी अनुराधा यांनी खूप चांगल्याप्रकारे गायली आहेत. आजही रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा अनुराधा पौडवाल हजेरी लावतात तेव्हा त्यांच्या सुपरहिट गाण्यांसाठी त्यांना ट्रिब्यूट दिलं जातं. अनुराधा यांची गाणी सदाबहार आहेत.
अनुराधा पौडवाल यांची तुलना दिवंगत गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या गायिकांसोबत होऊ लागली होती. पतीच्या निधनानंतर अनुराधा यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. हळूहळू त्यांनी चित्रपटांमध्ये गाणी गाणं कमी केलं.
अनुराधा पौडवाल यांचं करिअर (Anuradha Paudwal Career)
कर्नाटकातील कारवारमध्ये 27 ऑक्टोबर 1954 रोजी अनुराधा पौडवाल यांचा जन्म झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अनुराधा पौडवाल यांनी कधीही क्लासिक सिंगिंगचा क्लास लावला नाही. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गज गायिकांच्या गाण्यांचा त्यांनी रियाज केला. अनुराधा पौडवाल 1969 मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. अरुण पौडवाल हे सिनेसृष्टीसोबत जोडले गेलेले होते. पतीच्या सांगण्यावरुन त्या गायणाच्या क्षेत्रात आल्या.
अनुराधा पौडवाल यांनी 1973 मध्ये 'अभिमान' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या 'हीरो' या चित्रपटातील 'तू मेरा दिलबर है' हे त्यांचं पहिलं सुपरहिट गाणं ठरलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी बॅक टू बॅक गाणी गायली आणि ती सुपरहिटदेखील झाली. 80-90च्या दशकात त्यांनी एकापेक्षाएक सुपरहिट रोमँटिक गाणी गायली आहेत. पण एका वेळेनंतर त्यांनी चित्रपटांमध्ये गाणी गाणं बंद केलं.
अनुराधा पौडवाल यांची गाणी (Anuradha Paudwal Songs)
अनुराधा पौडवालने 'दिल है की मानता नहीं', 'धक-धक करने लगा','जानें जिगर जानेमन','मुझे तुमसे है इतने गिले' सारखी ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत. 90 च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिल्याने त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. एका वेळेनंतर अनुराधाने गाणी गाणं बंद केलं आणि टी-सीरिजसाठी भजने गाऊ लागल्या.
कसं संपलं अनुराधा पौडवाल यांचं करिअर?
अनुराधा पौडवाल यांचा आवाज इंडस्ट्रीतील संगीतकारांच्या पसंतीस उतरत असे. एका दिवसाला त्या 25 ते 30 गाण्यांचं रेकॉर्डिंग करत होत्या. अनुराधा प्रत्येक दिवशी यशाच्या पायऱ्या चढत होत्या. अनुराधा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहेचलेल्या तेव्हाही अरुण पौडवाल यांनी एसडी बरमनसोबत काम सुरूच ठेवलं. एसजी बरमन हे आरडी बरमन यांचे वडील आणि आशा भोसले यांचे साससे होते. अनुराधा पौडवाल यांच्या लोकप्रियतेची आणि कामाची लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना समम्या होती असं म्हणतात.
मीडिया रिपोर्टनुसार, आशा भोसले एकदा रेकॉर्डिंगसाठी सासऱ्यांच्या स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अरुण पौडवाल यांना चांगलं काम करत नसल्याने कामावरुन काढून टाकलं. त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनाही खूप वाईट वाटलं होतं. 1991 मध्ये अरुण पौडवाल यांचे अपघाती निधन झाले. पण तरीही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्या टी-सीरिजसाठी गाणी गाऊ लागल्या. त्यावेळी गुलशन कुमार यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे अनुराधा पौडवाल यांच्यासोबत गुलशन कुमार यांचं नाव जोडलं गेलं. अनुराधा पौडवाल या शांत स्वभावाच्या आहेत. अनुराधा यांनी आपल्या आयुष्यात अनेक लोकांना गमावलं आहे.
संबंधित बातम्या