(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind Vs Pak : भारताचा पाकिस्तानवर विजय! अमिताभ बच्चन ते वरुण धवन; बॉलिवूडमध्ये जल्लोष
Ind Vs Pak : भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. सर्वसामान्यांप्रमाणे आता बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील टीम इंडियावर (Team India) अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
T20 World Cup 2024 : भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात (Ind Vs Pakistan T20 World Cup 2024) सलग दुसरा विजय साजरा केला. भारतीयांसाठी क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून धर्म आहे. प्रत्येक सामन्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता असते. नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवण्याने सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील टीम इंडियाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करत आहेत.
वरुण धवन - वरुण धवनने इंस्टा स्टोरीवर सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे,"क्या मॅच, क्या प्रदर्शन, टीम इंडिया! जय हिन्द!".
अमिताभ बच्चन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भारताच्या विजयानंतर एक खास ट्वीट केलं आहे. बीग बींनी लिहिलं आहे,"अरे बाप रे बाप! भारत-पाकिस्तानचा सामना पाहत होतो आणि अचानक मध्येच टीव्ही बंद केला. आपण हरतोय की काय असं वाटत होतं. पण इंटरनेटच्या माध्यमातून आपण जिंकल्याचं कळलं. इंडिया इंडिया इंडिया".
T 5037(i) - अरे बाप रे बाप ! Ind v Pak खेला देख रहे थे, और बीच में बंद कर दिया TV, क्योंकि लगा हार तो रहे हैं हम !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 9, 2024
लेकिन अभी अचानक Internet देखा और 🕺 🕺🕺👏💪
WE WON WE WON WE WON !!!
YEEEAAAAAAHHHHHHH .... !!!!!
INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA INDIA 🇮🇳 pic.twitter.com/CRRi6vFnBY
सिद्धार्थ मल्होत्रा - सिद्धार्थ मल्होत्राने टीम इंडियाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"क्या जीत है, टीम इंडिया, हॅपी संडे... नेहमीप्रमाणे एक वेगळीच उत्सुकता होती".
कार्तिक आर्यन - कार्तिक आर्यनने लिहिलं आहे,"चँपियन बनेगी टीम इंडिया..क्या जीत है".
विजय वर्माने त्याचे मित्र जयदीप अहलावत, सनी हिंदुजा, प्रभात रघुनंदन आणि जसवंत दलाल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"येस...वॉट अ कमबॅक इंडिया क्रिकेट टीम".
ईशान खट्टर - ईशान खट्टने भारत-पाकिस्तानच्या सामन्याला 'नेक-बायटिंग क्लायमॅक्स' म्हटलं आहे.
कुणाल खेमू आणि बॉबी देओलने आपल्या कुटुंबियांसोबत सामना पाहिला आहे.
भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. न्यूयॉर्कमधल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी अवघं 120 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं 10 षटकांत एक बाद 57 धावांची मजल मारली होती. त्यामुळं सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकल्याचं चित्र होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीत जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्यानं कमालीचा मारा करून विजय खेचून आणला. बुमरानं चार षटकांत 14 धावा मोजून तीन फलंदाजांना माघारी धाडलं. हार्दिकनं चार षटकांत 24 धावा मोजून दोन विकेट्स काढल्या. त्याआधी रिषभ पंतच्या 31 चेंडूंमधल्या 42 धावांच्या खेळीनं भारताला 19 षटकांत सर्व बाद 119 धावांची मजल मारून दिली होती. दरम्यान, पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानं भारताचं सुपर एटचं तिकीट जवळजवळ कन्फर्म झालं आहे. पण या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानचं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातलं आव्हान संकटात आलं आहे.
संबंधित बातम्या