एक्स्प्लोर

Telly Masala : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज ते ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rinku Rajguru : आर्चीसोबत लग्न करायचे आहे? रिंकूच्या वडिलांनी सांगितल्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा

Rinku Rajguru Marriage :  'सैराट' चित्रपटातून तरुणाईला याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकू चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देते. रिंकूच्या वडिलांनी त्यांच्या होणाऱ्या जावयाबाबतच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. या अटी पू्र्ण करणाऱ्या मुलासोबत रिंकूचे लग्न लावून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...

Marathi Serial Updates Shivani Surve :  टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी मराठी वाहिन्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका सुरू आहेत. आजपासून स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravaj) 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thod Tuz Thod Maz) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) ही तब्बल 12 वर्षानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक करत आहे. याआधी शिवानी सुर्वेने 'देवयानी' मालिकेत काम केले होते. या  मालिकेमुळे शिवानी सुर्वे घराघरात पोहचली होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Chandu Champion Kartik Aaryan : 'चंदू चॅम्पियन' मधील गाण्याला मराठी अभिनेत्याचा आवाज; अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली, आता बॉलिवूडपटात पार्श्वगायन

Chandu Champion Movie : बॉक्स ऑफिसवर सध्या 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पॅराऑलिम्पिक पदक विजेते  मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. मात्र, मराठीतील एका अभिनेत्याने मात्र पार्श्वगायन केले आहे. सध्या या चित्रपटातील गाणे चांगलेच चर्चेत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपली छाप सोडणारा अभिनेता कैलास वाघमारेने (Kailash Waghmare) या चित्रपटातील गाण्याला आवाज दिला आहे. मेमे खानसोबत त्याने गायलेले 'जमुरा' हे गाणं सध्या चर्चेत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Hruta Durgule : ‘महाराष्ट्राची क्रश’ आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार; शेअर केला टीझर, 'या' भूमिकेत दिसणार?

Hruta Durgule In Web Series :  मराठी छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप सोडणारी आणि महाराष्ट्राची क्रश ओळखली जाणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आता हिंदीत पदार्पण करणार आहे. हृता ही हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ओटीटीवर रिलीज होणाऱ्या कमांडर करण सक्सेना या वेब सीरिजमध्ये ती झळकणार आहे. तिने या वेब सीरिजचा टीझर शेअर केला आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Munjya Box Office Collection Day 10 : 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसला याड लावलं, 10 दिवसांत किती केली कमाई?

Munjya Box Office Collection Day 10 : रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची  (Munjya Movie) क्रेझ दिसली. शुक्रवारी रिलीज झालेल्या कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाला 'मुंज्या'ने टक्कर दिली आहे. 'मुंज्या'ने रिलीजच्या एका आठवड्यातच आपल्या बजेट इतकी कमाई केली. रिलीजच्या 10 व्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Marathi Serial Punha Kartavya Aahe : किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले

Marathi Serial Punha Kartavya Aahe :  छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिकांच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सीरियलच्या स्टोरी प्लॉटमध्ये रंजकता आणण्यासाठी काही प्रयोगही केले जातात. मात्र, काही वेळेस प्रेक्षकांना हे प्रयोग आवडतात. तर, काही वेळेस हे बदल रुचत नाहीत. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सुरू असलेली 'पुन्हा कर्तव्य आहे' ( Punha Kartavya Aahe) या मालिकेवर प्रेक्षकांनी टीका केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्तMVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Embed widget