Telly Masala : शाहरुख खानकडून राम चरणचा अपमान? ते कपिल शर्मा शोच्या प्रोमोवर कॉमेडियन सुनील पालचा संताप; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Shah Rukh Khan Disrespects Ram Charan : किंग खानने केला सुपरस्टार राम चरणचा अपमान? नेटकरी संतापले, म्हणाले, शाहरुखचे हे वक्तव्य...
Shah Rukh Khan Disrespects Ram Charan : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगच्या शाही सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्यात हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने परफॉर्मन्स सादर केला होता. त्याशिवाय, बॉलिवूड आणि इतर सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग कार्यक्रमामधील एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने (Shah Rukh Khan) दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा अपमान केला असल्याची चर्चा धरू लागली आहे. स्टेजवर बोलवताना शाहरुखने राम चरणचा (Ram Charan) उल्लेख इडली असा केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडू लागली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Yana Gupta Actress : कुठं गायब झाली 'बाबूजी जरा धीरे चलो' सांगणारी याना गुप्ता? सिनेसृष्टीला रामराम करून या क्षेत्रात रमली
Yana Gupta Actress Model : बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकेकाळी आयटम साँगची (Item Song) लाट आली होती. त्यातील काही गाणी आजही सिनेरसिकांच्या लक्षात आहेत. आजही ही गाणी धुमाकूळ घालतात. सेलिब्रेशन असो किंवा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम यामध्ये ही गाणी वाजतात. 2003 मध्ये आलेल्या विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), दिया मिर्झा (Dia Mirza), अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांची भूमिका असलेला 'दम' (Dum Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा दम दाखवता आला नाही. पण, यातील आयटम साँग आजही लोकप्रिय आहे. 'बाबूजी जरा धीरे चलो' (Babuji Zara Dheere Chalo) हे गाणं आजही लोक ऐकतात. या गाण्यावर थिरकणारी याना गुप्ता स्टार झाली होती. मात्र, ही याना गुप्ता अचानक कुठं गायब झाली?
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावकर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका, तर अंकिता लोखंडेही दिसणार मुख्य भूमिकेत
Swatantra Veer Savarkar Movie trailer released: मागील अनेक दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावकर (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता होती. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारली आहे. हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?
Anant-Radhika Pre-Wedding: जामनगरमध्ये धुमधडक्यात अंबानींचा धाकटा लेक अनंत (Anant Ambani) आणि राधिकाचा (Radhika Marchant) प्री वेडिंग सोहळा पार पडला. सध्या जवळपास सोशल मीडियापासून सगळीकडे या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. यातील एक व्हिडिओ मात्र सध्या बराच चर्चेत आलाय. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबांनींच्या (Neeta Ambani) यांच्या या व्हिडओने सध्या बरीच खळबळ माजवली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Kapil Sharma New Show On Netflix : कपिल शर्मा शोच्या प्रोमोवर कॉमेडियन सुनील पालचा संताप, सुरुवातच इतकी वाईट की...
Kapil Sharma New Show On Netflix : छोट्या पडद्यावर कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) आपल्या शोने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले. आता कपिल शर्माचा कॉमेडी शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या शोद्वारे सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि कपिल शर्मा (Kapil Sharma) मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करणार आहेत. या शोचा प्रोमो देखील लाँच करण्यात आला. हा शो 30 मार्च पासून स्ट्रीम होणार आहे. कॉमेडियन सुनील पालने (Sunil Pal) मात्र, या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रोमो अतिशय वाईट असून कपिल शर्माने कॉमेडीला वाचवावं असं सुनील पालने म्हटले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...