Anant-Radhika Pre-Wedding: जगात श्रीमंत असलेल्या अंबानींच्या घरी आहे 'हा' डॉन, राधिका - अनंतच्या प्री वेडिंगमधला हा व्हिडिओ पाहिलात का?
Anant-Radhika Pre-Wedding: नुकताच राधिका आणि अनंत यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Anant-Radhika Pre-Wedding: जामनगरमध्ये धुमधडक्यात अंबानींचा धाकटा लेक अनंत (Anant Ambani) आणि राधिकाचा (Radhika Marchant) प्री वेडिंग सोहळा पार पडला. सध्या जवळपास सोशल मीडियापासून सगळीकडे या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. यातील एक व्हिडिओ मात्र सध्या बराच चर्चेत आलाय. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबांनींच्या (Neeta Ambani) यांच्या या व्हिडओने सध्या बरीच खळबळ माजवली आहे.
या व्हिडिओमध्ये नीता आणि मुकेश अंबानी यांनी त्यांच्या घरातील खऱ्या डॉनची ओळख करुन दिली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मुकेश अंबानी एका अलिशान खुर्चीवर गॉगल घालून बसले आहेत. या व्हिडिओमध्ये डॉन सिनेमातला 'डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' हा डॉयलॉग ऐकायला मिळतोय. त्यानंतर या व्हिडिओमध्ये नीता अंबानी यांची एन्ट्री होते. आपल्याला अनंतच्या संगीतला जायला उशीर होतोय असं त्या मुकेश अंबानी यांना सांगतात. यावर मुकेश 'येस बॉस' असं बोलतात. हमारी जिंदगी मै असली डॉन एक हीं थी, एक ही है और एकहीं रहेंगी...असं बोलतात, यावेळी नीता त्या अलिशान खुर्चीवर बसून आपणंच बॉस असल्याचं सर्वांना दाखवतात. सध्या या भन्नाट व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
View this post on Instagram
अनंत राधिकाच्या प्री वेडिंगचा सोहळा
दिव्यांची रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट, भव्य स्टेज आणि दिग्गज मंडळी यांमुळे अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगचा सोहळा हा दिमाखदार झाला. 1 ते 3 मार्च दरम्यान या गुजरातमधील जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स, ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग, ‘ब्लॅकरॉक’चे सीईओ लॅरी फिंक, ‘ब्लॅकस्टोन’चे संस्थापक स्टीफन श्वार्झमन, ‘मॉर्गन स्टॅन्ले’चे सीईओ टेड पिक, ‘बँक ऑफ अमेरिके’चे अध्यक्ष ब्रायन थॉमस मॉयनीहॅन, ‘डिस्ने’चे सीईओ बॉब एग्नर आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांक ट्रम्प ही मंडळी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती.
बॉलिवूडकरांची मांदियाळी
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची बरीच चर्चा सुरु होती. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचले. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती लावली.