एक्स्प्लोर

Telly masala : अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिवरायांच्या काळातील शिक्षा देण्याची अभिनेत्याची मागणी ते श्रद्धा कपूरने पंतप्रधान मोदींना टाकलं मागे; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly masala : सध्या मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Stree 2 : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान मोदींना टाकलं मागे, 'स्त्री 2' नंतर लोकप्रियता वाढली

Shraddha Kapoor crosses PM Modi : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. स्त्री 2 चित्रपटाने इतर चित्रपटांना धोबीपछाड दिला आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाई करताना दिसत आहे. त्याचा परिणाम तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही दिसून येत आहे. स्त्री 2 हा चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता खूप वाढली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत ती पंतप्रधान मोदींच्याही एक पाऊल पुढे पोहोचली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Riteish Deshmukh : 'त्या' नराधमांना छत्रपती शिवरायांच्या काळातील शिक्षा व्हायला हवी, शिवकालीन चौरंग शिक्षा काय आहे?

मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतच दोन चिमुकल्या मुलींवर पाशवी अत्याचाराच्या घटनेनं देशभरात खळबळ माजली आहे. शाळेतच मुलींसोबत गैरकृत्य घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध होत असून सेलिब्रिटींनीही यावर कडक शब्दात प्रतिक्रिया मांडली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही या घटनेचा निषेध करत या गैरकृत्यासाठी शिवरायांच्या काळातील शिक्षेची आठवण करुन दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Nikki Tamboli Love Story : बिग बॉसच्या घरात या सदस्यानं निक्कीला केलेलं KISS, भर कार्यक्रमात गुडघे टेकून प्रपोजही; निक्की तांबोळीची 'ही' लव्हस्टोरी तुम्हाला माहितीय?

मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूपच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून सर्वाधिक चर्चित सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी बिग बॉस 14 मधील स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाल्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी राडा करुन निक्कीने ती चर्चेत का असते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. दरम्यान, निक्की तांबोळी आणि प्रतीक सहजपाल यांची 'बिग बॉस'वाली लव्हस्टोरी जाणून घ्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi : ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणाऱ्या जान्हवीसाठी नवरा मैदानात, पॅडीबाबत वादग्रस्त वक्तव्याबाबत म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात नुकताच बीबी करन्सीसाठी टास्क पार पडला. यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. टीम A आणि टीम B मध्ये फुल ऑन बाचाबाची झाली. यावेळी जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली. जान्हवीने पॅडीबद्दल लाजिरवाणं भाष्य केलं. पॅडीवर टीका करताना जान्हवीने पातळी सोडली, यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. नेटकऱ्यांनी जान्हवीला चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. टीकांचा भडीमार सहन करणाऱ्या जान्हवीसाठी आता नवरा मैदानात उतरला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Stree 2 BO Collection : श्रद्धा कपूरचा अक्षय कुमार आणि जॉनला धोबीपछाड, 'स्त्री 2' समोर 'खेल खेल में' आणि 'वेदा'ची जादू फिकी

Stree 2 vs Khel Khel Mein vs Veda Box Office Collection : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दिग्गज स्टार्सच्या या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये  श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपटाचा धमाका पाहायला मिळत आहेत. स्त्री 2 चित्रपटाने प्री-बुकींगमध्येही कोट्यवधींची कमाई केली, त्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. आता सहा दिवसांनंतरही चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक
Fifa World Cup: नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
Manjari Fadnis: डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
डोक्यात सळीनं मारलं, गोणीत भरलं अन् खाडीत...; प्रसिद्ध अभिनेत्री ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Christopher Nolan The Odyssey Advance Booking: 'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत
'धुरंधर'ला धोबीपछाड, 3300 रुपयांना विकलं जातंय 'या' फिल्मचं एक तिकीट; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच भल्याभल्या लोळवलं, कमाईचे सारे रेकॉर्ड मोडीत

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, LPG सिलेंडरच्या दरावरु राहल गांधींचा हल्लाबोल
Share Market : बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
बाजारात व्ही-शेप रिकव्हरी! ओला इलेक्ट्रिकसह 'हे' 3 शेअर्स ब्रेकआउटमुळे चर्चेत
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
धोंड्याच्या महिन्यात जावयासह लेकीचाही मान; पुण्यात सुनेलाही धोंडे दान, चक्क चांदीच्या चप्पल भेट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
आता, माझ्याकडून वाद मिटलाय, विषय संपलाय; सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीवर अखेर रंगकाम, प्रसाद वेदपाठकची पोस्ट
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
Embed widget