एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Stree 2 BO Collection : श्रद्धा कपूरचा अक्षय कुमार आणि जॉनला धोबीपछाड, 'स्त्री 2' समोर 'खेल खेल में' आणि 'वेदा'ची जादू फिकी

Stree 2 vs Khel Khel Mein Box Office Collection : स्त्री 2 चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरु असून त्यासमोर अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटांना फारशी कमाई करता आलेली नाही.

Stree 2 vs Khel Khel Mein vs Veda Box Office Collection : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दिग्गज स्टार्सच्या या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये  श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपटाचा धमाका पाहायला मिळत आहेत. स्त्री 2 चित्रपटाने प्री-बुकींगमध्येही कोट्यवधींची कमाई केली, त्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. आता सहा दिवसांनंतरही चित्रपटाची घोडदौड सुरुच आहे.

श्रद्धा कपूरचा अक्षय कुमार आणि जॉनला धोबीपछाड

श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 चित्रपटाने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटांची जणू हवाच काढली आहे. अक्षय कुमारचा खेल खेल में चित्रपट आणि जॉन अब्राहमचा वेदा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज झाला. पण, या चित्रपटांमध्ये स्त्री 2 चित्रपटाचा दबदबा जास्त असल्याचं दिसून येत आहे. ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ हे दोन्ही चित्रपट ‘स्त्री 2’च्यासमोर टिकण्यात अपयशी ठरले आहेत. वीकेंड आणि रक्षाबंधनाच्या दिवशीही चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाही. स्त्री 2 चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात अनेक विक्रम केले. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 51.8 कोटींची कमाई केली.

'स्त्री 2' समोर 'खेल खेल में' आणि 'वेदा'ची जादू फिकी

Sacnilk च्या अहवालानुसार, Stree 2 ने 6 व्या दिवशी 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे हे आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन आहे. कमाईत 31.84 टक्के घट झाली असली तरी, Stree 2 ने 250 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. स्त्री 6 व्या दिवसाची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. 

'खेल खेल में' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई 

खेल खेल में चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता, त्यामुळे या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान आणि एमी विर्क सारख्या स्टार स्टडेट 'खेल खेल में' चित्रपटाचं बजेट 100 कोटी रुपये आहे. खेल खेल में चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 2.05 कोटी, 3.1 कोटी, 3.85 कोटी आणि 2 कोटींचा गल्ला जमवला. पण सहा दिवसांत या चित्रपटाला केवळ 17.15 कोटींची कमाई करता आली आहे.

रिलीजच्या 6 व्या दिवशी 'वेदा' चित्रपटाची कमाई

जॉन अब्राहमच्या ॲक्शनपॅक 'वेदा' चित्रपटालाही समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाची ओपनिंग चांगली झाली होती,  पण स्त्री 2 आणि वेदा चित्रपटामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवलेली नाही. वेदा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 6.3 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 1.8 कोटींची कमाई, तर तिसऱ्या दिवशी 2.7 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं कलेक्शन चौथ्या दिवशी 3.2 कोटी आणि पाचव्या दिवशी 1.5 कोटी होते. मीडिया रिपोर्टनुसार, वेदा चित्रपटाची सहाव्या दिवशीची कमाई 60 लाख रुपये आहे. यामुळे वेद चित्रपटाचं एकूण 6 दिवसांचं कलेक्शन 16.10 कोटी रुपये झालं आहे.

'वेदा' आणि 'खेल खेल में' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले

'वेद' आणि 'खेल खेल में' चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटूनही 20 कोटींचा आकडा गाठता आलेला नाही. दोन्ही चित्रपटांना स्त्री 2 ने धोबीपछाड दिली. आठवडाभरापूर्वीच 'वेदा'ची कमाई लाखांवर पोहोचली आहे. या चित्रपटांच्या निर्मात्यांनाही कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. आता हे चित्रपट किती काळ तग धरतात हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Olympic Winner Manu Bhaker : ना शाहरुख, ना सलमान, ना आमिर... या अभिनेत्याची फॅन आहे ऑलिम्पिक विजेती मनू भाकर; म्हणाली, "डार्लिंग..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | झीएआयच्या सर्वेनुसार मराठवाड्यात मविआला 24-29 जागा मिळण्याची शक्यताABP MajhaPune Vidhansabha Exit Poll : दादा, शिंदे, फडणवीस की ठाकरे? मतदानानंतर पुणेकरांचा कौल कुणाला?EVM Vehicle Attack Nagpur : अधिकाऱ्यांच्या कारवर दगडफेक!EVM घेऊन जाणाऱ्या कारवर हल्लाMaharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget