Stree 2 : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान मोदींना टाकलं मागे, 'स्त्री 2' नंतर लोकप्रियता वाढली
Shraddha Kapoor Insta Followers : स्त्री 2 हा चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता खूप वाढली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत ती पंतप्रधान मोदींच्याही एक पाऊल पुढे पोहोचली आहे.
![Stree 2 : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान मोदींना टाकलं मागे, 'स्त्री 2' नंतर लोकप्रियता वाढली Shraddha Kapoor Supasses PM Narendra Modi on Instagram Followers popularity on high after Priyanka Chopra Virat Kohli stree 2 success Box Office Collection marathi news Stree 2 : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान मोदींना टाकलं मागे, 'स्त्री 2' नंतर लोकप्रियता वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/21/651f1486008fb16e49b624b7c5389c091724236123528322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shraddha Kapoor crosses PM Modi : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. स्त्री 2 चित्रपटाने इतर चित्रपटांना धोबीपछाड दिला आहे. चित्रपटाच्या प्रचंड कमाई करताना दिसत आहे. त्याचा परिणाम तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही दिसून येत आहे. स्त्री 2 हा चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता खूप वाढली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत ती पंतप्रधान मोदींच्याही एक पाऊल पुढे पोहोचली आहे.
'स्त्री 2' नंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता वाढली
'स्त्री 2' चित्रपटाच्या (Stree 2 Movie) यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) इंस्टाग्राम फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धा कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकलं आहे. 'स्त्री 2' चित्रपटानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या चित्रपटातील श्रद्धा कपूरचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून याचा परिणाम तिच्या लोकप्रियतेवरही दिसून येत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकलं आहे.
इन्स्टाग्रामवर श्रद्धा कपूरचा दबदबा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकत श्रद्धा कपूर इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत तिसरी सर्वाधिक फॉलोअर भारतीय व्यक्ती बनली आहे. आता या शर्यतीत त्याच्या पुढे फक्त दोनच लोक आहेत. सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारी दुसरी भारतीय व्यक्ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. तर क्रिकेटर विराट कोहली इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतील पहिल्या क्रमांकावर आहे. श्रद्धा कपूरने आता पंतप्रधान मोदींना मागे टाकलं आहे. या फॉलोअर्सच्या बाबतीत थोड्याशा फरकाने पंतप्रधानांच्या पुढे गेली आहे. तथापि, पीएम मोदी X (पूर्वीचे ट्विटर) फॉलोअर्सच्या बाबतीत खूप पुढे आहेत.
View this post on Instagram
श्रद्धा कपूरने पीएम मोदींना टाकलं मागे
'स्त्री 2' चित्रपट रिलीज झाल्यानंतर, श्रद्धा कपूर आता इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप 3 च्या यादीत सामील झाली आहे. भारतातील टॉप इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. तिला लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. श्रद्धा कपूरचे इंस्टाग्रामवर 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर 91.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ही माहिती 21 ऑगस्ट 2024 पर्यंतची आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nikki Tamboli Love Story : बिग बॉसच्या घरात या सदस्यानं निक्कीला केलेलं KISS, भर कार्यक्रमात गुडघे टेकून प्रपोजही; निक्की तांबोळीची 'ही' लव्हस्टोरी तुम्हाला माहितीय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)