एक्स्प्लोर

Telly Masala : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा अपघात ते स्क्विड गेमवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मनोरंजन विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित आताच्या घडीच्या बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Car Accident : बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण कार अपघात, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Actor Praveen Dabas Car Accident : बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रवीण डबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी मुंबईत प्रवीण डबासचा कार अपघात झाला. अपघातानंतर जखम प्रवीणला मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमिताभ आणि शाहरुखनंतर डॉनच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात; 'या' दिवशी रिलीज होणार Don 3

Don 3 Movie Update : बॉलिवूडमधील हिट सिनेमांपैकी एक म्हणजे डॉन. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी डॉनची भूमिका गाजवली. डॉन आणि डॉन 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता डॉन 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. डॉन 3 मध्ये अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ आणि शाहरुखनंतर रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi : बिग बॉस शो संपल्यानंतर निक्कीसोबतच्या नात्याचं काय? पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना अरबाज बोबडी वळणार?

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : आज बिग बॉस मराठी भाऊचा धक्का पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात खूप कल्ला पाहायला मिळाला. टास्क दरम्यान, वादही झाले आणि काही सदस्यांना दुखापतही झाली. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा सातवा आठवडा आता संपणार आहे. यादरम्यान, सदस्यांना महाराष्ट्राचा धक्का मिळणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात पत्रकारांची एन्ट्री होणार आहे. पत्रकार सदस्यांना प्रश्न विचारुन भांबावून सोडली, आता यामध्ये उत्तरं देताना कोणत्या सदस्याची बोबडी वळणार हे पाहालं लागणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Squid Game-Luck Contro : स्क्विड गेमवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप, तुंबाड' फेम सोहम शाहकडून खटला दाखल

Squid Game-Luck Copy Content Issue : स्क्विड गेम सीझन 2 चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या वेब सीरिजवर कंटेंट चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तुंबाड चित्रपटातील अभिनेता आणि निर्माता सोहम शाह याने स्क्विड गेम सीरीज विरोधात कंटेंट चोरीचा आरोप करत खटला दाखल केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षित 4 चित्रपट ओटीटीवर रिलीज, वेब सीरीजमधूनही मनोरंजनाचा डोस

OTT Releases on Weekend : आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात ओटीटीवर (OTT) येणाऱ्या वेब सीरीज आणि चित्रपटांची यादी आणली आहे, जी तुम्ही घरबसल्या पाहू शकता. ओटीटीवर प्रेक्षक नवीन रिलीज झालेले चित्रपट आणि वेब सीरीज पाहून त्यांच्या कामाचा ताण कमी करतात आणि यामुळे त्यांना कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. ओटीटीवर दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रत्येक वीकेंडची आतुरतेने वाट पाहतात. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित झाले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget