एक्स्प्लोर

OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षित 4 चित्रपट ओटीटीवर रिलीज, वेब सीरीजमधूनही मनोरंजनाचा डोस

OTT Release This Week : काही बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाले असून या वीकेंडला तुम्ही मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता.

OTT Releases on Weekend : आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात ओटीटीवर (OTT) येणाऱ्या वेब सीरीज आणि चित्रपटांची यादी आणली आहे, जी तुम्ही घरबसल्या पाहू शकता. ओटीटीवर प्रेक्षक नवीन रिलीज झालेले चित्रपट आणि वेब सीरीज पाहून त्यांच्या कामाचा ताण कमी करतात आणि यामुळे त्यांना कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. ओटीटीवर दर्जेदार कंटेंट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रत्येक वीकेंडची आतुरतेने वाट पाहतात. या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर प्रदर्शित झाले आहेत, जे तुम्ही Netflix, Chaupal, Amazon Prime Video, Jio Cinema आणि Disney Plus Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 20 सप्टेंबरला एकाच वेळी 4 बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत.

थंगलान (Thangalaan)

15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झालेला थंगलान एक तमिळ ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पा. रणजीत यांनी केलं आहे. ब्रिटिश राजवटीत एका आदिवासी नेत्याची ही कथा आहे. थंगलान हा एक नेता त्याची पत्नी आणि मुलांसह गावात राहतो. त्याच्या संघर्षाची ही कथा आहे. 20 सप्टेंबर रोजी थंगलान चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

द पेंग्विन (The Penguin)

द बॅटमॅनवर आधारित स्पिन-ऑफ 'द पेंग्विन' वेब सीरिज जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. क्राइम ड्रामा ओस्वाल्ड 'ओझ' कोबलपॉटच्या उदयावर केंद्रित आहे. 8 भागांच्या या सीरीज तुम्हाला 19 सप्टेंबरपासून ओटीटीवर पाहता येणार आहे.

जो तेरा हैं वो मेरा हैं (Jo Tera Hai Woh Mera Hai)

ही कथा एका दृधनिश्चयी तरुणाची आहे. जो तेरा हैं वो मेरा हैं चित्रपटात लाइट कॉमेडीसह भावनिक ड्रामाही पाहायला मिळणार आहे. जेव्हा एका वृद्ध व्यक्तीला घर सोडायला भाग पाडलं जातं आणि हा व्यक्ती कुटुंबाती सदस्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो. जो तेरा हैं वो मेरा हैं चित्रपट 20 सप्टेंबर रोजी Netflix वर प्रदर्शित झाला आहे.

थलैवटीयन पलयम (Thalaivettiyaan Palayam)

पंचायत वेब सीरिजचा तमिळ रिमेक आहे. थलायवतीयान पलायम हे एक छोटेसं गाव आहे जिथे सिद्धार्थला ग्रामपंचायत सचिवाची भूमिका सोपवण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज झाला. प्रेक्षकांना रिमेक खूप आवडला आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2 (The Great Indian Kapil Show)

'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा एकदा दुसऱ्या सीझनसह नेटफ्लिक्सवर परतणार आहे. कपिल शर्मा आपल्या कॉमेडी गँगसोबत पुन्हा एकदा सर्वांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. आलिया भट्ट, करण जोहर, सैफ अली खान, जान्हवी कपूर, ज्युनियर एनटीआर सारखे स्टार्स नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' 21 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget