अमिताभ आणि शाहरुखनंतर डॉनच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह, चित्रपटाच्या तयारीला सुरुवात; 'या' दिवशी रिलीज होणार Don 3
Don 3 Movie : अमिताभ आणि शाहरुखनंतर रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
Don 3 Movie Update : बॉलिवूडमधील हिट सिनेमांपैकी एक म्हणजे डॉन. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी डॉनची भूमिका गाजवली. डॉन आणि डॉन 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता डॉन 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. डॉन 3 मध्ये अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ आणि शाहरुखनंतर रणवीर सिंह डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
अमिताभ, शाहरुखनंतर डॉनच्या भूमिकेत दिसणार रणवीर सिंह
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी 'डॉन' बनून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. 70 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी डॉन बनून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्यानंतर शाहरुख खानने 2006 साली डॉन आणि 2011 मध्ये डॉन 2 चित्रपटातून बॉक्स ऑफिस गाजवला. शाहरुखने डॉन चित्रपटातून दोन वेळा निर्मात्यांना प्रचंड नफा मिळवून दिला कमावला. आता पुन्हा एक नवा डॉन पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंह आता डॉनची भूमिका साकारणार आहे.
डॉन 3 चित्रपटाच्या तयारीला सुरुवात
रणवीर सिंह आणि कियारा अडवाणी यांना डॉन फ्रँचायझी 'डॉन-3'च्या पुढील चित्रपटात कास्ट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रणवीर सिंहनेही डॉन-3 चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू झाली असून सध्या रणवीर भूमिकेसाठी स्वत:ला तयार करत आहे. डॉन 3 चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार आहे.
View this post on Instagram
डॉन 3 केव्हा रिलीज होणार? ( Don 3 Movie Release Date Update )
फरहान अख्तर निर्मित या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून चित्रपटाचं शूटिंग जानेवारी 2025 मध्ये सुरू होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2025 मध्ये मे-जूनमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. डॉनच्या भूमिकेसाठी रणवीर सिंहनेही तयारी सुरू केली आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानची जादू
रणवीर सिंहच्या आधी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दोघांनी मोठ्या पडद्यावर सुपरहिट डॉन साकारला आहे. शाहरुख खानने डॉन फ्रेंचायझीच्या दोन चित्रपटात काम केलं आणि भरपूर कमाई केली. 1978 मध्ये रिलीज झालेल्या डॉन या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. सुमारे 70 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 7 कोटींहून अधिक कमाई करण्यात यशस्वी ठरला होता. इतकंच नाही तर वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये हा सिनेमा तिसऱ्या क्रमांकावर होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :