(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Squid Game-Luck Contro : स्क्विड गेमवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप, सोहम शाहकडून खटला दाखल
Soham Shah Accuses Squid Game Makers : बॉलिवूड दिग्दर्शक सोहम शाह याने स्क्विड गेम वेब सीरिजवर कंटेट चोरीचा आरोप केला आहे.
Squid Game-Luck Copy Content Issue : स्क्विड गेम सीझन 2 चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या वेब सीरिजवर कंटेंट चोरीचा आरोप करण्यात आला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक सोहम शाह याने स्क्विड गेम सीरीज विरोधात कंटेंट चोरीचा आरोप करत खटला दाखल केला आहे. आता त्याने कोरियन निर्मात्यांवर खटला दाखल केला आहे. असं असलं तरी सोहम शाहच्या चित्रपटावरही कंटेंट चोरीचा आरोप करण्यात येत आहे.
स्क्विड गेम सीरिजवर बॉलिवूडचा कंटेंट कॉपी केल्याचा आरोप
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील 'स्क्विड गेम' ही हिट वेब सीरिज आहे. आता बॉलिवूड दिग्दर्शक सोहम शाहने 'स्क्विड गेम' सीरिजचे निर्माते ह्वांग डोंग-ह्युक यांच्यावर कंटेंट चोरीचा आरोप करून खटला दाखल केला. सोहम शाहने आरोप केला आहे की, 'स्क्विड गेम' वेब सीरिजने 2009 मध्ये आलेल्या 'लक' या हिंदी चित्रपटाची कथा कॉपी केली आहे.
'स्क्विड गेम' या चित्रपटाची कॉपी
'स्क्विड गेम' वेब सीरिज आणि 'लक' या दोन्ही चित्रपटांच्या कथांमध्ये बरंच साम्य आहे. त्यामुळे एकीकडे सोहम शाहने स्क्विड गेम सीरिजवर कंटेंट चोरीचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे सोहम शाहवरही कंटेंट चोरीचा आरोप होत आहे. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, सोहम शाहचा 'लक' हा चित्रपट दुसऱ्याच कोणत्या तरी चित्रपटापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोहम शाहच्या चित्रपटावर कंटेंट चोरीचा आरोप
एका मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात येत आहे की, जेव्हा सोहम लक चित्रपट बनवत होता, तेव्हा त्याने टीमला, त्याने 2005 मध्ये आलेल्या फ्रेंच चित्रपट 13 Tazmetti चा संदर्भ दिला होता. लक चित्रपटासारखी कथा याआधी तयार झाली नव्हती असं नव्हतं. लक चित्रपटामधील अनेक दृश्य हे इतर चित्रपटांपासून प्रेरित होते. लक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अफवा पसरली होत्या की, हा चित्रपट 2007 च्या ॲक्शन फिल्म 'द कंडेम्डची' कॉपी होता, पण सोहम शाहने त्यावेळी हे दावे फेटाळले होते.
2005 मध्ये आलेल्या बॉलिवूड चित्रपटाचा कंटेंट चोरल्याचा आरोप
सोहम शाहने दाखल केलेल्या खटल्यात दावा करण्यात आला आहे की 'स्क्विड गेम' वेब सीरिजची कथा 'लक' चित्रपटाची कथा जास्त खोल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2005 मध्ये आलेला'लक' चित्रपटात इम्रान खान, संजय दत्त आणि श्रुती हासन हा कर्जबाजारी लोकांबद्दलची कहाणी दाखवण्यात आली आहे. कर्जबाजारी लोक मोठ्या प्रमाणात पैसे जिंकण्याच्या संधीसाठी गेम सीरिजमध्ये सामील होतात. दरम्यान, नेटफ्लिक्सने हे दावे फेटाळले आहेत.