Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार; मकरंद अनासपुरेंसोबत स्क्रीन शेअर करणार
Tejaswini Lonari : 'बिग बॉस मराठी' फेम तेजस्विनी लोणारीचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार; मकरंद अनासपुरेंसोबत स्क्रीन शेअर करणार Tejaswini Lonari new movie Tejaswini Lonari Makarand Anaspure upcoming movie Tejaswini Lonari : 'बिग बॉस'फेम तेजस्विनी लोणारी आता सिनेमात झळकणार; मकरंद अनासपुरेंसोबत स्क्रीन शेअर करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/09/afa696a555268915f9dd4d61e99d21261681023962391254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tejaswini Lonari Upcoming Movie : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) सध्या चर्चेत आहेत. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व गाजवणारी तसेच 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणाऱ्या तेजस्विनीचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेजस्विनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आगामी सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तेजस्विनीच्या आगामी सिनेमाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. पण या सिनेमात ती मराठमोळे अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Anaspure) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
तेजस्विनी लोणारीची पोस्ट काय? (Tejaswini Lonari Post)
तेजस्विनीने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"वयाच्या सोळाव्या वर्षापासून मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनासपुरे सर ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. धमाकेदार चित्रपट...लवकरच".
तेजस्विनी आणि मकरंद अनासपुरे पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर
तेजस्विनी आणि मकरंद अनासपुरे यांनी याआधीदेखील अनेक सिनेमात काम केलं आहे. 'दोघात तिसरा आता सगळा विसरा', 'नो प्रॉब्लेम', 'बाप रे बाप डोक्याला ताप', 'गुलदस्ता' आणि 'बायको नंबर 1' या सिनेमांत तेजस्विनीने मकरंद अनासपुरे यांच्यासोबत काम केलं आहे.
तेजस्विनीच्या चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा!
तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोत ती नवरीच्या लुकमध्ये तर मकरंद अनासपुरे नवरदेवाच्या लुकमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर एका सेकंदासाठी शॉक झालो, पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र पाहायला आम्ही उत्सुक आहोत, माझं पहिलं प्रेम, पुढील सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तेजस्विनी आणि मकरंद अनासपुरे यांचा आगामी सिनेमा कोणता असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
'बिग बॉस मराठी 4'ची पब्लिक वीनर तेजस्विनी!
तेजस्विनी लोणारी 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाची पब्लिक वीनर ठरली आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व तेजस्विनी जिंकावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. पण दुखापत झाल्याने तेजस्विनीला घरातून बाहेर जावं लागलं. तिच्या जाण्याने चाहते नाराज झाले होते.
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात तेजस्विनी लोणारीची पुन्हा एन्ट्री; लाडक्या तेजूच्या येण्याने सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)