Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात तेजस्विनी लोणारीची पुन्हा एन्ट्री; लाडक्या तेजूच्या येण्याने सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण
Tejaswini Lonari : बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची तेजस्विनी लोणारी 'पब्लिक वीनर' ठरली आहे.
Tejaswini Lonari On Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या पर्वातील सर्वांची लाडकी स्पर्धक अर्थात तेजू 'बिग बॉस'च्या घरातून दुखापत झाल्याने बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. आता तेजस्विनीने पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.
तेजस्विनी लोणारीने बिग बॉसचं चौथं पर्व जिंकावं असं चाहत्यांना वाटलं होतं. पण दुखापतीमुळे तेजस्विनी घराबाहेर पडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी तेजस्विनीला 'बिग बॉस 4'ची पब्लिक वीनर म्हणून घोषित केलं होतं. आता पुन्हा एकदा तेजस्विनीची बिग बॉसच्या चौथ्या पर्वात एन्ट्री झाल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
तेजस्विनीच्या येण्याने बिग बॉसच्या चौथ्या पर्वातील सदस्य आनंदी झाले आहेत. कलर्स मराठीने नुकताच यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्विनीच्या येण्याने घरातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
View this post on Instagram
तेजस्विनीने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"जेव्हा सगळचं संपलय असं आपल्याला वाटून जातं तेव्हा तिच खरी वेळ असते नवं काहीतरी सुरू होण्याची. गुरुवारी हात फॅक्चर झाला होता आणि आज गुरुवारीच तो बरादेखील झाला आहे. आयुष्यातील खडतर प्रवासात तुम्हा लोकांची ज्यापद्धतीने मला साथ लाभली आहे ते पाहता माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नसेल... तुमचे मनापासून आभार".
'बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा रंगणार
'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व टीआरपीच्या शर्यतीत मागे पडलं आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. आता या घरातील स्पर्धकांचे 100 दिवस पूर्ण होत आले असून या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी 4'चा महाअंतिम सोहळा 8 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे.
संबंधित बातम्या