एक्स्प्लोर

अनुष्का शर्माच्या सिनेमाच्या सेटवर एकाचा शॉक लागून मृत्यू

अनुष्का शर्माची मुख्य भूमिका असलेल्या 'परी' सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखांना हायलाईट करण्यासाठी सेटवर दिवेलावण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या वायरमधून त्याला विजेचा धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी 'परी' चित्रपटाच्या सेटवर एका तंत्रज्ञाला प्राण गमवावे लागले आहेत. लाईव्ह वायरच्या संपर्कात आल्यामुळे विजेचा धक्का बसून शहाबे आलम नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. 'परी' चित्रपटाच्या सेटवर लाईटिंग डिपार्टमेंटमध्ये टेक्निशियन म्हणून शहाबे काम करत होता. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. आऊटडोअर शूटिंगच्या वेळी शहाबे लाईव्ह वायरच्या संपर्कात आला. शॉक लागल्यानंतर शहाबेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. बांबूच्या एका बनात 'परी' चित्रपटातील सीन शूट करण्यात येत होता. मुख्य व्यक्तिरेखांना हायलाईट करण्यासाठी दिवे लावण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या वायरमधून त्याला विजेचा धक्का बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहाबेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परी चित्रपटाचं शूटिंग तात्पुरतं थांबवण्यात आलं होतं. दिग्दर्शक प्रॉसित रॉय यांचं पदार्पण असलेला 'परी' हा चित्रपट हॉरर लव्ह स्टोरी आहे. अनुष्कासोबत बंगाली अभिनेता परंब्रता चौधरीही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Hai Jawani Toh Ishq Hona Hai: Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?
Romance अन् कॉमेडीचा तडका; डेव्हिड धवनच्या 'हैं जवानी तो इश्क होना हैं'ला प्रेक्षकांची पसंती, किती कमावले?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Embed widget