Haseen Dillruba : प्रतिक्षा संपली! आज रात्री प्रदर्शित होणार तापसी पन्नूचा 'हसीन दिलरुबा'
Haseen Dillruba : तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि विक्रांत मेसी यांचा हसीन दिलरुबा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बॉलवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी यांचा हसीन दिलरुबा हा चित्रपट आज रात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची आतुरता अनेकांना होती. आता ही आतुरता संपली आहे.
हसीन दिलरुबा या चित्रपटातून लव्ह ट्रॅंगल दाखवलेला आहे. ट्रेलरमध्ये तर तापसी पन्नू बोल्ड लूकमध्ये दिसते. या चित्रपटाची कथा ही एका छोट्या शहरातील आहे. त्यामध्ये तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी हे पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात हर्षवर्धन राणे हा तापसीच्या प्रियकराच्या भूमिकेत दाखवला आहे. नंतर तापसीच्या पतीचा खून होता आणि त्याचा संशय हा थेट तापसीवर जातो. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असतात.
हसीन दिलरुबा या चित्रपटातील दिनेश पंडितची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. या चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की तापसी ही दिनेश पंडित नावाच्या एका लेखकाची मोठी चाहती असते आणि त्याने लिहिलेल्या कादंबऱ्या ती वाचत असते. या चित्रपटाच्या ट्रेलरची विशेष गोष्ट अशी आहे की, यातील प्रत्येक भूमिका ही सस्पेन्स दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. तापसी पन्नू आपल्या वेगळ्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या चित्रपटातूनही ती आपल्या अभिनयाची जादू कायम ठेवणार का याचीही उत्सुकता आहे.
हसिन दिलरुबा हा चित्रपट नेटफिक्स ओरिजनल फिल्म आहे. त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार आहे. नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 2 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येऊ शकेल. या चित्रपटाची लांबी ही दोन तास 16 मिनीटे इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा : संजय राऊत
- राष्ट्रवादी मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आलीय; गाडीवरील दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका
- Palghar Malnutrition : पालघरमध्ये कुपोषणाने पुन्हा डोकं वर काढलं, दोन महिन्यात 40 बालमृत्यू तर 5 मातामृत्यू