कंगना रनौत अन् तापसी पन्नूमध्ये ट्विटर वॉर; कंगनाच्या टीकेवर तापसीचं प्रत्युत्तर, म्हणाली...
कंगना रनौत ट्विटरवर नेहमीच चर्चेत असते. आजही कंगना पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदा कंगनाने थेट तापसी पन्नूसोबत पंगा घेतला आहे.
![कंगना रनौत अन् तापसी पन्नूमध्ये ट्विटर वॉर; कंगनाच्या टीकेवर तापसीचं प्रत्युत्तर, म्हणाली... Taapsee pannu and kangana ranaut face to face on twitter taapsee gave a befitting reply without naming कंगना रनौत अन् तापसी पन्नूमध्ये ट्विटर वॉर; कंगनाच्या टीकेवर तापसीचं प्रत्युत्तर, म्हणाली...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/11152229/Kangana-Tapsi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंगनाने अभिनेत्री तापसी पन्नूसोबत पंगा घेतला आहे. या दोघींमधील ट्विटर वॉर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आज सकाळी कंगनाने तापसी पन्नू (Tapsee pannu) बाबत एक कमेंट केली. आता तापसीने या कमेंटवर आपल्या खास अंदाजात प्रत्युत्तर दिलं आहे.
कंगनाचं ट्वीट
काही दिवसांपूर्वी तापसी पन्नूने एक फोटोशूट केलं होतं. कंगनाचं म्हणणं आहे की, तापसीने तिची पोज कॉपी केली आहे. यावरुनच कंगनाने ट्वीट केलंय. कंगनाने तापसीचं नाव घेतलं नाही. परंतु, तिने तिच्या ट्वीटवर तिच्या चाहत्याने केलेल्या कमेंटवर रिप्लाय केला आहे. त्यावरुन स्पष्ट होत आहे की, कंगनाचा निशाणा तापसीवरच आहे. कंगनाने लिहिलं आहे की, 'अभिनेत्रीने तिला संपूर्ण आयुष्यभर कॉपी केलं आहे.'
तापसीचं कंगनाला प्रत्युत्तर
कंगनाच्या या कमेंटवर तापसीने हटके अंदाजात तिला प्रत्युत्तर दिलं आहे. तापसीने कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता लिहिलं की, "ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि जे प्रत्येक कामात संपूर्ण असतात, ते ईर्षा करत नाहीत.' तापसीने कमेंट करताच लोकांना तिचा इशारा समजला. त्यानंतर अद्याप कंगनाने तापसीच्या ट्वीटवर काहीत प्रतिक्रिया दिलेली नाही.
#ThoughtOfTheDay actually almost everyday now :) pic.twitter.com/Eddkepc1Mx
— taapsee pannu (@taapsee) January 10, 2021
आगामी प्रोजेक्टमध्ये दोन्ही अभिनेत्री बीझी
दरम्यान, दोन्ही अभिनेत्री आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बीझी आहेत. कंगनाने थलायवीची शूटींग पूर्ण केली होती आणि आता ती धाकड प्रोजेक्टमध्ये बीझी आहे. तर तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकणात बीझी आहे. तापसीचे आगामी चित्रपट नो शाबाश मिट्टू, रश्मि रॉकेट, लूप लपेटा, हसीन दिलरुबा येत्या काही दिवसांत रिलीज होणार आहेत. दरम्यान, अद्याप या चित्रपटांची रिलीज डेट फायनल झालेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)