एनसीबीचं धाडसत्र; बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर अन् तिच्या बहिणीसह एक ब्रिटीश नागरिक अटकेत
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर गेल्या वर्षी एक केस रजिस्टर करण्यात आली होती. याप्रकरणी तपासादरम्यान एनसीबीने केलेल्या कारवाईत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर, तिची बहिणी आणि एका ब्रिटीश नागरिकाला ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : एनसीबीने शुक्रवारी रात्रीपासून शनिवारच्या दुपारपर्यंत मुंबईतील तीन ठिकाणी धाड टाकून दोन महिला आणि एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली आहे. या तिघांकडूनही एनसीबीने जवळपास 200 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, अटक करणाऱ्या आलेल्या दोन महिला बहिणी असून त्यापैकी एका महिलेने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची मॅनेजर म्हणून काम पाहिलं आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं राहिला फर्नीचरवाला, तिची बहिण साहिस्ता फर्नीचरवाला आणि करण सजनानी (ब्रिटिश नागरिक) अशी आहेत. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर गेल्या वर्षात एक केस रजिस्टर करण्यात आली होती. याच खटल्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, अनुज केसवानी यांनी अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी तपासादरम्यान एनसीबीला राहिला फर्नीचरवाला हिच्याबाबत शंका आली होती.
एनसीबीला चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात राहिला फर्नीचरवाला हिने सांगितलं की, तिने 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी तिने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पुरवल्या होत्या. त्याचसोबत ती भारताच्या गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालयमध्ये ड्रग्स सप्लाय करत होती. एनसीबी सजनानीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी जबाबदार मानते, याप्रकरणी अद्याप अधिक तपास सुरु आहे.
एनसीबीचं धाडसत्र
एनसीबीला मिळालेल्या एका माहितीनंतर शनिवारी एनसीबीने वांद्रे येथील एका कुरियर कार्यालयावर धाड टाकली आणि मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला. त्यानंतर एनसीबीने खारच्या जसवंत हाइट्समध्ये राहणाऱ्या सजनानी याच्या घरावर रेड टाकली. सजनानी हा एक ब्रिटीश नागरिक आहे. सजनानीची चौकशी केल्यानंतर राहिला आणि साहिस्ताच्या घरावर एनसीबीनं धाड टाकली. त्यानंतर या दोन्ही बहिणींकडून गांजा जप्त करण्यात आला.
ड्रग्जचं अमेरिका कनेक्शन
एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 75 किलोग्राम गांजा ओजी कुश नावाने ओळखला जातो. 125 किलोग्राम मिक्स गांजा आणि 1.5 किलोग्राम मेरुआना बड जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, सजनानीवर आरोप लावण्यात आला आहे की, मेरुआना बड अमेरिकेहून इम्पोर्ट करत होता आणि काही तर उत्तर प्रदेशातही पाठवण्यात आला होता.
सजनानी खोट्याच्या आधारावर चलाखीने कस्टम ऑफिसची दिशाभूल करत बड्स भारतात घेऊन येत होता. आणि ते प्रिरोल्ड गांजा फॉर्ममध्ये मोठ्या लोकांना बड्या किंमतीत विकत होता. तसेच सजनानीवर आरोप लावण्यात आला आहे की, राहिला सजनानीला या कामासाठी आर्थिक आणि इतर मदत करत होती.